जळगांव दि.१ मे २०२४ : श्रमण संघीय महाराष्ट्र प्रवर्तिनी प. पु. महासतीजी डाॅ. ज्ञानप्रभाजी म. सा. यांचा 67 वा दिक्षा दिवस १ मे बुधवार रोजी उत्साहात संपन्न झाला.
महासतीजी श्रमणसंघीय आचार्य डाॅ शिवमूनीजी म. सा. यांच्या आज्ञानुवर्ती होत्या, त्यांचा जन्म नशिराबाद जि. जळगाव येथे झाला होता. त्यांना ता २१ एप्रिल २०२४ रोजी अहमदनगर येथे ” संथारा मरण” आले.
आज कार्यक्रमात आयंबिल तप आराधिका प. पु. सुशिलाकंवरजी म. सा. व प. पु. विजयमूनीजी म. सा. आदि गुरुंचे धर्मप्रवचन मांगलिक झाले, सदरचा कार्यक्रम आज सकाळी 9ते 10,30 दरम्यान स्वाध्याय भवन येथे संपन्न झाला.सदर कार्यक्रमात जळगाव येथील जैन समाजातील अग्रगण्य व आदरणीय व्यक्ती उपस्थित होत्या.
सुरवातीला जैन संघ अध्यक्ष श्री दलुभाऊ जैन यांनी महाराज साहेबांचा अल्प परिचय करून दिला.
त्या नंतर स्वाध्याय महिला मंडळा तर्फे ताराबाई डाकलिया , ताराबाई रेदासनी, शशिकला कटारिया , शुनग सांड यांनी प्रसंगनुरुप भाषण तथा स्तवण प्रस्तुत केले, त्यानंतर युवाचार्य ग्रुप व महिला मंडळ तर्फे शीतल डूंगरवाल, मनिषा डाकलिया, गीतांजलि लुंकड, ज्योति रायसोनी ,मिनल समदडिया यांनी प. पु. ज्ञानप्रभाजी म. सा. यांच्या विषयी आपले विचार मांडले व भक्तीगीत प्रस्तुत केले,
सदर कार्यक्रमातस युवाचार्य ग्रुप चे अध्यक्ष मनीष लुंकड ,पंकज ध जैन, नंदु डुंगरवाल, प्रदिप श्रीश्रीमाल, सुभाष रायसोनी,विनोद कोचर, चंद्रकांत लुंकड, जीवन लुंकड, , रवि खिंवसरा,हिरालाल लुंकड, दिनेश डाकलिया, संतोष सुराणा,सुधीर बाझल, निलेश कटारिया,सचिन चोरडिया, संजय रेदासनी ,मनोज कटारिया , सुरेश बिनाइक्या , प्रियेश छाजेड, प्रशांत छाजेड ,श्रेयस कुमट, अशोक कोठारी,समकित खिंवसरा तसेच महिला सदस्य हि मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,
कार्यक्रमा नंतर युवाचार्य ग्रुप तर्फे प्रभावना वाटण्यात आली.