जळगांव जिल्हाराजकिय

जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भगवा सप्ताह,समस्याग्रस्त जनतेला घेऊन लवकरच जनआंदोलन : उन्मेश पाटील यांचा निर्धार

भगव्या सप्ताहास जोरदार प्रतिसाद, जल्लोषपूर्ण वातावरणात शाखांचे उद्घाटन

लोकमाध्यम न्युज | जळगांव दि. ७ ऑगस्ट २०२४ |

रयतेचे राज्य व्हावे यासाठी भगवा खांद्यावर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. याच विचाराने भगवा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. या प्रेरणेने भगवा घेऊन आम्ही शिवसैनिक गावागावात जाऊन जनतेशी संवाद साधत आहोत. तालुक्यातील जनता लहान लहान समस्यांनी त्रस्त आहे. मात्र लोकप्रतिनिधी जमिनीवर न राहता जमिनी घेण्यात व्यस्त आहे.
उदासीन लोकप्रतिनिधी आणि निगरगट्ट महायुती सरकार या जात्यात जनता भरडली जात आहे. या सर्व जनतेला घेऊन शिवसेना लवकरच मोठे आंदोलन उभारणार आहे. अशी गर्जना शिवसेनेचे नेते माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केली आहे.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते गोरखपूर येथील शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख महेंद्रबापू पाटील, तालुका प्रमुख रमेशआबा चव्हाण,
विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव नाना खलाणे, बेलगंगा संचालक बाळासाहेब पाटील हिंगोणेकर,तालुका संघटक सुनील गायकवाड, तालुका प्रवक्ते संदीप घोरपडे, तालुका प्रमुख सविताताई कुमावत, पंचायत समिती उपसभापती भाऊसाहेब पाटील, पंस सदस्य रवी चौधरी,उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते,महेंद्र जैस्वाल,भटक्या विमुक्त सेना जिल्हाप्रमुख मारोती काळे, शेतकरी संघटना जिल्हा प्रमुख संजय पाटील, बारा बलुतेदार जिल्हा प्रमुख मुकेश गोसावी, ओबीसी जिल्हा प्रमुख संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्ते पप्पू राजपूत, युवा सेना क्षेत्र प्रमुख सुरेश पाटील, उपतालुका प्रमुख नाना शिंदे, माजी पंचायत समिती दिलीप पाटील,अनुसूचित जाती सेना शहर प्रमुख सोनू आहिरे, अविनाश पाटील, उपसरपंच आण्णा राठोड, रवी राजपुत, कांताबाई राठोड, सुलताना खान, लतिफ दादा, शेषराव चव्हाण, चेतन वाघ, अमित सुराणा, साहेबराव राठोड, प्रवीण पाटील, किशोर पवार, दिपक एरंडे, तुषार भावसार, सौरभ पाटील आदी उपस्थित होते.
जल्लोषपूर्ण वातावरणात शाखांचा उद्घाटन सोहळा
गोरखपुर (पिंपरखेड तांडा),32 नंबर तांडा,वलठाण तांडा,वलठाण गाव,पाटणा,चंडिकावाडी जूनपाणी,
चत्रभुज तांडा,शिंदी,ओढरे,
गणेशपूर या ठिकाणी शाखा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सायंकाळी आठ वाजता खासदार उन्मेशदादा पाटील यांनी गणेशपूर येथे शेतकरी संवाद साधत तालुक्याच्या समस्येवर प्रकाशझोत टाकला यावेळी गोरखपुर (पिंपरखेड तांडा) शाखा प्रमुख दिलिप चव्हाण, 32 नंबर तांडा शाखा प्रमुख दिनेश राठोड,वलठाण तांडा शाखा प्रमूख सोमनाथ जाधव,वलठाण गाव शाखा प्रमुख विक्की राठोड,पाटणा शाखा प्रमुख दिपक पाटील,चंडिकावाडी शाखा प्रमुख योगेश राठोड,जूनपाणी शाखा प्रमुख अंकुश राठोड,
चत्रभुज तांडा शाखा प्रमुख सोमनाथ राठोड ,शिंदी शाखा प्रमुख हेमंत फटांगरे, ओढरे शाखा प्रमुख नवनाथ पवार,गणेशपूर शाखा प्रमुख त्र्यंबक जाधव यांच्यासह, जेष्ठ शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button