ॲड.खडसे रोहिणी एकनाथराव यांच्या प्रचारार्थ सावदा शहरात खासदार अमोल कोल्हे यांचा रोड शोचे आयोजन
लोकमाध्यम न्युज | जळगांव १३ नोव्हेंबर २०२४ |
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ मुक्ताईनगर मतदारसंघातील रावेर तालुक्यातील सावदा शहरात संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांचा रोड शो गुरुवार (दि.१४) सकाळी ११ वाजता होणार आहे.
रोड शो बस स्टॅन्ड समोरील दुर्गा माता मंदिरापासून सुरू होईल व शहराच्या प्रमुख मार्गावरून जाऊन महाविकास आघाडीच्या तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हासमोरील बटण दाबुन रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे आवाहन खासदार अमोल कोल्हे हे नागरिकांना करतील.त्यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील.
तरी सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,महाविकास आघाडीवर प्रेम करणाऱ्या नागरिक बंधू भगिनींनी या रोडशोला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.