जळगावस्पोर्ट्स

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

अनुभूती निवासी स्कूलमध्ये राष्ट्रीय योगासन स्पर्धा रोमांचक

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. १८ जानेवारी २०२६ :अनुभूती स्कूल मध्ये सुरू असलेली राष्ट्रीय योगासना स्पर्धा रोमांचक स्थितीत असून आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र राज्याचा संघ आघाडीवर आहे‌. त्यासोबत आर्टिस्टिक एकल मध्ये पश्चिम बंगाल, आर्टिस्टिक ट्रेडिशनल मध्ये सीआयएससी कौन्सील बोर्ड पुढे आहे. शरीर, श्वास आणि साधनेचा अद्वितीय दर्शन स्पर्धक घडवित आहे, या स्पर्धतुन आज अंतिम विजेत्या ठरणार आहे.

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरू असलेली मुलींची १७ वर्षाखालील ६९ वी नॅशनल स्कूल गेम्स राष्ट्रीय योगासन स्पर्धेत ३३ संघ राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी अनुभूती निवासी शाळेत आले आहेत. त्यात १६७ खेळाडू सहभागी झाले आहेत. स्कूल गेम्स फेडरेशन च्या स्पर्धेत आर्टिस्टिक सिंगल, ट्रेडिशनल सिंगल, आर्टिस्टिक पेअर, रिदमिक पेअर या चार प्रकारात योगासनाची विविध आसने सादर करत आहेत.

सीआयएससीईचे सहसचिव अर्जित बासू, व्यवस्थापक अर्णव शॉ, विभागीय स्पोर्टस समन्वयक सिद्धार्थ किर्लोस्कर, मुख्य पंच डॉ. आरती पाल, एसजीएफआयचे मुख्य निरीक्षक रितू पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली जैन स्पोर्टस अकॅडेमी चे रवींद्र धर्माधिकारी, सय्यद मोहसीन, अजित घारगे, वरुण देशपांडे, किशोर सिंग सिसोदिया, घनश्याम चौधरी, उदय सोनवणे, अब्दुल मोहसीन, जयेश बाविस्कर, योगेश धोंगडे, मोहम्मद फजल, प्रवीण ठाकरे, कुलदीप राहुल निंभोरे, समीर शेख यांच्यासह सहकारी यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button