आध्यात्मिक साधनेमुळे आयुष्यात लाभते मनःशांती : आ.राजुमामा भोळे
सिखवाल समाजातर्फे आयोजित अन्नकुट महोत्सवात आ.भोळे यांच्या हस्ते पूजन
लोकमाध्यम न्युज | जळगांव ५ नोव्हेंबर २०२४ |
येथील विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी सिखवाल ब्राह्मण समाज आयोजित अन्नकुट महोत्सवाला उपस्थिती देऊन नागरिकांशी संवाद साधला. प्रसंगी, आध्यात्मिक साधनेमुळे आयुष्यात मन:शांती लाभते असे प्रतिपादन आमदार राजूमामा भोळे यांनी केले.
शहरात सिखवाल ब्राह्मण समाजातर्फे अन्नकुट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळेला समाज बांधवांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थिती दिली होती. कार्यक्रमांमध्ये महिला आणि पुरुष भाविकांनी भक्तीभावाने मनोभावे पूजन-अर्चन केले. यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी महर्षी ऋष्य शृंग यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन केले.
जीवनात आध्यात्मिक साधना महत्त्वाची आहे. दिवसातील काही वेळ भगवंताच्या सानिध्यात व पूजनात घालवला पाहिजे. त्यामुळे मनःशांती लाभते असे प्रतिपादन यावेळी आ. भोळे यांनी केले. प्रसंगी नागरिकांनी त्यांना पुन्हा निवडून येण्यासाठी शुभाशीर्वाद दिले व आम्ही तुमच्या पाठीशी राहू अशी ग्वाही या वेळेला नागरिकांनी दिली.