शासनाकडुन मिळालेल्या शेत जमिनीवर गांजाची लागवड
चोपडा तालुक्यातील मेलाने येथील घटना : एल.सी.बी.ची कारवाई
जळगाव दि. १३ : चोपडा तालुक्यातील मेलाने येथील राहणाऱ्या अर्जुन सुमायऱ्या पावरा यास शासना कडून उपजिविकेसाठी मिळालेली नवाड शेत जमीनीत त्याने मका पिकात कॅनाबिस वनस्पती (गांजा) गांजाची झाडे मिळून आल्याने जळगांव येथील एल्.सी.बी.चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील आणि त्यांच्या सहकारी पथकाने केलेल्या कारवाईत गांजाची झाडे उपटून त्याचे वजन केले असता ते ९८० किलो चे एकूण किमंत रुपये ४४,१०,०००/- रुपयाचे गांजाची हिरवे ओले झाडे जप्त करुन आरोपी अर्जुन सुमाऱ्या पावरा वय ४५ रा. मेलाणे ता. चोपडा यास ताब्यात घेवून गुन्हयांत अटक केली आहे. दि.१२ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, जळगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,किसन नजन पाटील, यांना गोपनिय माहिती मिळाली की, मेलाणे ता. चोपडा येथील राहणारा अर्जुन सुमायऱ्या पावरा हा त्यास शासना कडून उपजिविकेसाठी मिळालेल्या नवाड शेत जमीनीत त्याने मका पिकात कॅनाबिस वनस्पती (गांजा) या अंमली पदार्थाच्या वनस्पतीची लागवड केली. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार पोहेकॉ संदिप पाटील व प्रविण मांडोळे यांना खात्री करण्याबाबत पाठविले असता सदर ठिकाणी गांजाचे झाडांची लागवड केलेली दिसुन आली. त्यामुळे पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील, यांनी त्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, .डॉ. कृणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा यांना माहिती दिली. त्याप्रमाणे वरिष्ठांनी त्यांना योग्य ते मार्गदर्शन केल्याप्रमाणे त्यांनी सदर छापा कार्यवाहीसाठी लागणारे तपास साहित्यासह ते स्वताः व डॉ. कृणाल सोनवणे, कावेरी कमलाकर,पोलीस निरीक्षक, चोपडा ग्रामीण पो.स्टे., वनविभागाचे अधिकारी कमल डेकले, नायब तलसिलदार रवींद्र महाजन, फोटोग्राफर, वजनकाटा धारक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अमोल मोरे, सहा. पोलीस निरीक्षक, स.फौ.युनूस शेख, पोहेकॉ. सुनिल दामोदरे, संदिप पाटील, गोरख बागुल, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, दर्शन ढाकणे, पो.ना.अशोक पाटील, पोकों.बबन पाटील, मपोहेकॉ. रजनी माळी, मपोना.उपाली खरे आदी पथकासह सदर मेलाणे ता. चोपडा गावात राहणाऱ्या अर्जुन सुमाऱ्या पावरा याचे नवाड शेतात जावून त्याने मका पिकात पेरलेल्या गांजाची झाडे मिळून आल्याने ते उपटून त्याचे वजन केले असता ते ९८० किलो चे एकूण किमंत रुपये ४४,१०,०००/- रुपयाचे गांजाची हिरवे ओले झाडे जप्त करुन आरोपी अर्जुन सुमाऱ्या पावरा वय ४५ रा. मेलाणे ता. चोपडा यास ताब्यात घेवून गुन्हयांत अटक केली आहे. सदर बाबत चोपडा ग्रामीण पो.स्टे.ला CCTNS नं. ४०/२०२४ NDPS कायदा १९८५ चे कलम २०,२२ प्रमाणे गुन्हा दाखल असून पुढील तपास नितनवरे, सहा. पोलीस निरीक्षक, चोपडा ग्रामीण पो.स्टे. हे करीत आहेत.