जळगांव जिल्हासामाजिक

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिला जाणारा २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ जळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या निवेदिता सुनील ताठे यांना १७ मार्च रोजी नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ चर्चगेट मुंबई येथील एसएनडिटी महिला विद्यापीठाच्या पाटकर दीक्षांत सभागृहात वितरण सोहळा कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि महिला सबलीकरण क्षेत्रात निरलस कार्य करणार्‍या महिलांचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला. पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांत (दादा) पाटील हे होते. प्रमुख अतिथी म्हणून अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ, तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, वेणुगोपाल रेड्डी आणि एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांची प्रमुख उपस्थिती होती.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सेवावृत्तीचा वारसा पुढे नेणार्‍या महाराष्ट्राच्या सहा महसुली विभागातील निवडक ११ महिलांना मान्यवरांच्या हस्ते २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षीचे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा नाशिक विभागातील ज्ञान जोती सावित्रा rबाई फुले पुरस्कार, २०२३-२४ चा पुरस्कार जळगाव जिल्ह्यातील निवेदिता सुनिल ताठे यांना प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांची मूर्ती शाल श्रीफळ व एक लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. निवेदिता ताठे या स्त्री भृणहत्या, सर्व शिक्षा अभियान, महिलांसाठी सामाजिक परिवर्तनाचे कार्य, बालविवाह तसेच अत्याचार पीडित महिलांना मार्गदर्शन समुपदेशन अशा प्रश्नावर मागील अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांचे विविध सामाजिक संस्थांकडून अभिनंदन होत आहे. सोहळ्यास ा प्राचार्य, संचालक, अध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी,विद्यापीठाचे अधिकारी ,कर्मचारी आणि एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेक आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळानकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन सहसंचालक डॉ. अर्चना बोर्‍हाडे यांनी केले. जळगाव जिल्ह्यात हा पुरस्कार मिळाल्यानंतर निवेदिता ताठे यांना विविध संस्थांकडून सन्मानित करण्यात आले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button