“सुरभी” चा महिलादिन कार्यक्रम उत्साहात संपन्न
सुरभी बहुऊदेशिय महिला मंडळा तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
जळगांव दि१४ : येथील सुरभी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे जागतिक महिलदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सुरवातीला अध्यक्षा स्वाती कुलकर्णी,मंजुषा राव,लता छापेकर, डॉ.वृषाली छापेकर, संपदा छापेकर, ह्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. कवयत्री बहिणाबाई चौधरी ह्यांच्या गाण्यावर ज्योती भोकरडोळे, प्रतीक्षा मोहरीर, निता पारगावकर,स्वाती कुलकर्णी, पल्लवी मोहरीर, सुवर्णा कोटस्थाने ह्यांनी नृत्य सादर केले.प्रास्ताविकअध्यक्षा स्वाती कुलकर्णी ह्यांनी केले. “गोफ गुंफू या नात्यांच्या, सेतू बांधू या प्रेमाचा.” यावर आधारित लता छापेकर, डॉ.वृषाली छापेकर, संपदा छापेकर ह्यांची प्रगट मुलाखत मंजुषा राव ह्यांनी घेतली. सर्व परिवाराला एकत्रित कसे बांधून ठेवले तसेच स्वतःहाला आलेले अनुभव तिघींनी सांगितले. डॉ वृषाली छापेकरांनी ह्यावेळी महिलांना उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी. तसेच पाणी खूप प्यावे, विविध प्रकारची फळे खावीत, ह्याविषयीं मार्गदर्शन केले. संपदा छापेकर ह्यांच्या गायनाने मुलाखतीची सांगता करण्यात आली. महिला दिनानिमित्त घेतलेल्या ” आधुनिक काळात स्री ची भूमिका” ह्या निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण लता छापेकर व स्वाती कुळकर्णी ह्यांच्या हस्ते करण्यात आले.तर निबंध स्पर्धेचे परीक्षण कन्या शाळेच्या माजी मुख्यध्यापिका सुनीता नाईक ह्यांनी केले. स्पर्धे करीता एकूण 16 निबंध आले होते.
प्रथम – वैदेही नाखरे, द्वितीय -असावरी जोशी, तृतीय – वैशाली ढेपे, उत्येजनार्थ १अनुप्रिता बापट,उत्तेजनार्थ २ – डॉ.मृदुला कुलकर्णी. यांना पारितोषिके देण्यातआली.
कार्यक्रमांचे सुत्रसंचालन मानसी जोशी ह्यांनी केले. ह्यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या भारती पाटील व पुष्पा पाटील ह्यांचाही सत्कार करण्यात आला.
यशस्वितेसाठी नीलिमा नाईक, अश्विनी जोशी, आशा जोशी, ज्योती भोकरडोळे , सुनीता सातपुते, मेघा नाईक, सविता नाईक, रेवती शेंदुर्णीकर, पूनम जोशी, स्मिता शुक्ल, सविता परमार्थी ह्यांनी सहकार्य केले.