जळगांव जिल्हापोलीस

मोठी बातमी : श्रीकांत धिवरे जळगावचे नवे पोलीस अधीक्षक; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुणे सीआयडीत बदली!

राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल; गृह विभागाने जारी केले बदल्यांचे आदेश

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज (२० एप्रिल) राज्याच्या पोलीस प्रशासनात व्यापक फेरबदल केले आहेत. या आदेशानुसार जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी धुळे येथील पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची जळगावचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. रेड्डी यांची पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (CID) बदली करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील तरतुदींनुसार या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या धावपळीनंतर आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर या बदल्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

अशा झाल्या बदल्या (महत्त्वाच्या नियुक्ती)

राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची सांगलीत, तर पुण्याचे पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे यांची साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे आता मुंबईत राज्य गुप्तवार्ता विभागात (SID) जबाबदारी सांभाळतील.

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे, तर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांची पदोन्नतीसह गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.पुण्याचे पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांची वाशिमच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.

जळगावकरांच्या अपेक्षा वाढल्या

डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जळगावमध्ये अवैध शस्त्रे, गुन्हेगारी आणि प्रशासकीय शिस्त लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता धुळे येथील कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेले श्रीकांत धिवरे जळगावचा पदभार स्वीकारणार असल्याने, गुन्हेगारी नियंत्रणासाठी ते कोणती पावले उचलतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नवनियुक्त पोलिस अधिक्षक येत्या काही दिवसांत आपला पदभार स्वीकारतील.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button