जळगावमहापालिका

महावितरणला सबस्टेशनसाठीच्या जागांची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून पाहणी

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) दि. ६ मे –शहरातील नागरिकांना अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेकडून हालचाली सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी बुधवारी (६ मे) शहरातील महावितरणच्या प्रस्तावित सब स्टेशनसाठी राखीव असलेल्या विविध जागांची प्रत्यक्ष पाहणी केली

महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील विविध प्रस्तावित जागांची पाहणी करून तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. या प्राथमिक पाहणीदरम्यान, सब स्टेशन उभारताना कोणकोणत्या तांत्रिक आणि स्थानिक अडचणी येऊ शकतात, याची सविस्तर माहिती घेण्यात आली. या पाहणी दौऱ्याच्या वेळी नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, महानगरपालिकेचे विजय मराठे (नगररचना विभाग), सुमित पाटील (विद्युत विभाग) यांच्यासह महावितरणचे अधिकारी जयदीप साळी आणि वाणी आदी अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button