लोकमाध्यम न्युज | जळगांव २९ डिसेंबर २०२४ |
जिथे दिवा लावाल तिथे अंधार होणार नाही, त्याचप्रमाणे एखाद्या ठिकाणी अंधार केला तेथे प्रकाश पडणार नाही. आपण जे कर्म करतो त्यानुसारच परमेश्वर आपल्याला फळ देतो, त्यामुळे सतत चांगले कर्म करत राहा, असा संदेश कथा व्यास हभप डॉ. विशालशास्त्री गुरुबा यांनी दिला.तरुण कुढापा मंडळातर्फे जुने जळगावातील मनपा शाळा क्रमांक ३, पांजरापोळ येथे २५ डिसेंबरपासून संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या दुसऱ्या दिवशी डॉ.गुरूबा यांच्या वाणीतून श्रोतेभाविक मंत्रमुग्ध झाले.
कोणाचा द्वेष करू नये
आर्थिक, बौद्धिक, सामाजिक पाप करू नये. आपल्यापेक्षा कोणी गरीब आहे तर त्याची मस्करी करू नये. अंतकरणाने, चित्ताने, मनाने, भावनेने जेवढे तुम्ही शुद्ध राहाल तेवढाच तुमच्या आयुष्याचा एक – एक दिवस सुखी – आनंदी होईल, असा भागवताचा संदेश आहे. कधी कोणाचा द्वेष करू नये. मनुष्याच्या निर्मितीच्या जाळ्यात मनुष्य मृत्यू पावतो. एकदा म्हणा हे भगवंता हा श्वास ही तुझा आहे. पहा तुमच्या जीवनात रोज दिवाळी होईल, असा माझा विश्वास आहे, असेही डॉ. गुरुबा यांनी आपल्या मधुर वाणीतून सांगितले.
यांच्या हस्ते झाली महाआरती
कथेनंतर हॉटेल व्यावसायिक नंदू चौधरी, सुवर्ण व्यापारी कैलास सोनी, अशोक सोनी, भारतीय जनता पक्ष ओबीसी अध्यक्ष जयेश भावसार, दूध व्यावसायिक मनोज पाटील या मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आले. यावेळी श्रोते भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज श्री राम, जन्म कृष्ण जन्मोत्सव
कथेच्या पाचव्या दिवशी रविवारी श्रीराम जन्म व कृष्णजन्म उत्सव होणार आहे. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन तरुण कुढापा मंडळातर्फे करण्यात आले आहे. दररोज कथा दुपारी १ ते ५ या वेळेत होत असून कथेदरम्यान दहीहंडी उत्सव, विवाह सोहळा, सुदामा चरित्र असे विविध कार्यक्रम होणार आहे. कथेची सांगता मिरवणूक काढून होईल आणि नंतर गोपाळ काल्याचे किर्तन आणि महाप्रसादाचे वाटप होणार आहे.