जळगावशैक्षणिक

राष्ट्रीय स्तरावरील इनो टेक फेस्ट जल्लोषात

केसीईच्या इंजिनिअरिंग व मॅनेजमेंट महाविद्यालयात विज्ञान, तंत्रज्ञानासह आनंदाची पर्वणी

जळगाव दि.२४ : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग व मॅनेजमेंट महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय स्तरावर इनो टेक फेस्ट २ के २४ उत्साहात झाले. यात राज्यातूनच नव्हे, तर देशभरातील विविध महाविद्यालयातील हजाराच्या वर विद्यार्थी सहभागी झाले होते. जणू या महाकुंभ मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञाना सोबत आनंदाची पर्वणी अनुभवली.
प्रमुख पाहुणे सुप्रीम इंडस्ट्रीचे माजी संचालक संजय प्रभुदेसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डिजिटिलायझशनच्या जागतिक मागणीची पूर्तता करण्यासाठी विविध लँग्वेज ऑपरेशन, इंटरनेट आणि इतर डिजिटल तंत्रज्ञानात विविध प्रकारच्या क्षमता आणि अधिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विस्तार आणि भविष्यातील इतर संधी विकसित करण्यासाठी असे कार्यक्रम आवश्यक आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
टेक्नोफेस्ट एक सशक्त व्यासपीठ…
तंत्रज्ञानाशी निगडित स्पर्धेच्या आयोजनाद्वारे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील कौशल्य सादर करण्याची संधी निर्माण करून देण्यात आली. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये रस निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचा हा एक प्रयत्न आहे. संधीचा महासागर शोधण्यासाठी तयार असलेल्या महत्वकांक्षी मनाच्या विद्यार्थ्यांकरिता टेक्नोफेस्ट हे एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे मत प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन् डॉ.प्रज्ञा विखार यांनी राष्ट्रीय स्तरावर इनो टेक फेस्ट २ के २४ च्या आयोजनाबद्दल माहिती दिली. …. विविध स्पर्धांचा निकाल ….
याप्रसंगी पेपर प्रेझेंटेशन, चेस, कॅरम, हैड्रो लाँच, प्रोजेक्ट एक्सिबिशन, पोस्टर प्रेझेंटेशन, ट्रेझर हंट, क्वीझ कॉम्पिटिशन अशा विविध स्पर्धा झाल्या. स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे – कॅरम मुलींमध्ये प्रथम क्र. साक्षी निकम (के.सी.ई. पॉलिटेक्निक , जळगाव), तर मुलांमध्ये प्रथम क्र. निरंजन पवार व द्वितीय क्र. साद् बागवान (के.सी.ई पॉलिटेक्निक, जळगाव), चेसमध्ये प्रथम क्र. दिव्येश कुलकर्णी (मू.जे.महाविदयालय, जळगाव), द्वितीय क्र. संकेत कुलकर्णी (के.सी.ई. अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव), क्वीझ कॉन्टेस्टमध्ये प्रथम क्र. सुशांत नेमाडे (के.सी.ई. अभियांत्रिकी महाविदयालय, जळगाव), द्वितीय क्र. ऋतूजा हेमराज नेहेते (के.सी.ई अभियांत्रिकी महाविदयालय, जळगाव), तृतीय क्र.शेख जावेद अहमद व पुष्पक देवरे (पद्मश्री व्ही.बी.कोलते कॉलेज, मलकापूर) पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा – मुलींमध्ये प्रथम क्र. तेजल दीपक पाटील (डॉ.अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महाविद्यालय, जळगाव) द्वितीय क्र. रेवती पाटील (के.सी.ई पॉलिटेक्निक, जळगाव), तृतीय क्र. आरती चिकाटे व अभिषेक तायडे (पद्मश्री व्ही.बी.कोलते कॉलेज मलकापूर), तर उतेजनार्थ समृध्दी नेमाडे (के.सी.ई अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव व कंदर्प सुभाष पाटील (शासकीय पॉलिटेक्निक, जळगाव), हैद्रो लाँचमध्ये प्रथम क्र. वैभव चव्हाण व द्वितीय क्र. कुणाल दुसाने (के.सी.ई. मेकॅनिकल द्वितीय वर्ष अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव), वर्ड्स वार मध्ये प्रथम क्र.आकाश चौधरी व वैष्णवी राणे (के.सी. ई अभियांत्रिकी महाविदयालय, जळगाव), द्वितीय क्र. प्रसन्न कुलकर्णी व शुभम चव्हाण (मू.जे.महाविद्यालय, जळगाव) पेपर प्रेझेंटेशनमध्ये वसुधा सचिन पाटील व कंदर्प सुभाष पाटील (शासकीय पॉलिटेक्निक, जळगाव), द्वितीय क्र. किमया इंगळे (के.सी.ई.पॉलिटेक्निक, जळगाव), तृतीय क्र. दीक्षिता चोपडा व चिन्मयी लोखंडे (जी.एच.रायसोनी, जळगाव ), लेन्स अँड लाइटमध्ये प्रथम क्र.गौरव गोसावी व द्वितीय क्र. चिराग जैन (के.सी.ई.पॉलिटेक्निक, जळगाव), प्रोजेक्ट एक्सिबिशनमध्ये चैताली पाटील, प्रमोद जोहरे, पूर्वेश माळी, साक्षी करोडे, तर मयूर सूर्यवंशी, मुकुल राजपुरोहित, घनश्याम पाटील, सिद्देश लोहार यांना पारितोषिक मिळाले. एन.एफ.एस.मध्ये प्रथम क्र. गणेश पाटील व द्वितीय क्र. समीर मोरे (के.सी.ई अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव), बिग्मीमध्ये प्रथम क्र. योगांत सोनवणे, राज पाटील, मयूर पाटील, रितिक भोई, (एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव व ए.सी.एस.कॉलेज, धरणगाव), द्वितीय क्र. लोकेश सुरेश सोनवणे, सौरव बाविस्कर, कुणाल कावळे, ऋषी बारी (मू.जे.महाविद्यालय, जळगाव), मनोरंजक अशा ट्रेझर हंटमध्ये प्रथम क्र. वैष्णवी चौधरी अँड ग्रुप (जी.एच.रायसोनी, जळगाव), तर द्वितीय क्र. यज्ञेश बारी अँड ग्रुप (के.सी.ई अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव). सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना पदक देऊन गौरवण्यात आले. परीक्षक म्हणून डॉ. एम.ए.पांडे (मू.जे.महाविदयालय, जळगाव), आर. बी. ठाकरे (इलेक्ट्रोसॉफ्ट), डॉ.विणा भोसले (के.सी.ई .अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविदयालय, जळगाव), प्रा. बी. एस. पाटील (एस.एस.मणियार लॉ कॉलेज, जळगाव), प्रवीण ठाकरे (जैन स्पोर्ट्स), सय्यद मोहासिन (जैन स्पोर्ट्स अकॅडमी) यांनी काम पाहिले. विद्यार्थी समन्वयक म्हणून निखिल पाटील, योगेश मिस्त्री, श्वेता चौधरी, आयोजन समितीमध्ये प्रा. लीना वाघूळदे, प्रा.उमाकांत कठोके, प्रा.समाधान खैरे, प्रा.कल्पेश , महाजन, प्रा.दीपाली रडे, सल्लागार समितीमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन् डॉ.श्रीकांत तारे, सायन्स हुम्यानिटीझ विभाग प्रमुख प्रा.के.बी.पाटील, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा.दर्शन ठाकूर, संगणक विभाग प्रमुख ए.वाय.सूर्यवंशी, इलेक्ट्रिकल विभागातील प्रा.राहुलकुमार पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
या वेळी प्राचार्य डॉ.संजय सुगंधी, अकॅडमिक डीन् डॉ.प्रज्ञा विखार, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन् डॉ श्रीकांत तारे, कार्यक्रम आयोजक प्रा.हेमंत वाणी व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन जय सरोदे, वैष्णवी राणे, ललित पाटील यांनी केले. आभार प्रा. हेमंत वाणी यांनी मानले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button