जळगांव जिल्हाआर्थिकगुन्हे

बिल मंजूर करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला ५ लाख स्वीकारताना रंगेहाथ अटक

जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) दि. ९ मे – जिल्ह्यात शासकीय विभागांमधील लाचखोरीचे प्रमाण अद्याप थांबत नसल्याचे चित्र आज पुन्हा एकदा समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ने शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) कारवाई करत शाखा अभियंता योगेश अहिरे यांना रंगेहाथ ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली आहे. या कारवाईने विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एका नोंदणीकृत कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत केलेल्या विविध कामांचे लाखो रुपयांचे बिल प्रलंबित होते. या बिलाची मंजुरी करून देण्यासाठी कंत्राटदाराने शाखा अभियंता योगेश अहिरे यांच्याशी संपर्क साधला. अहिरे यांनी बिल मंजूर करण्याच्या बदल्यात प्रथम १५ लाख रुपयांची लाच मागितली.

लाच देण्यास तयार नसलेल्या कंत्राटदाराने तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची सखोल पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले.

आज शनिवारी ( दि ९ मे ) दुपारच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात एसीबी पथकाने सापळा रचला. ठरलेल्या रकमेनुसार तडजोडीत ५ लाख रुपये स्वीकारताना अभियंता योगेश अहिरे यांना पथकाने जागीच रंगेहाथ अटक केली.

या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोरीच्या प्रकरणा मुले नवे impetus मिळाले असून, विभागातील इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्येही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button