जळगांव जिल्हाक्राईम

प्रेमविवाहाचा भीषण शेवट : सेवानिवृत्त सीआरपीएफ बापाचा हळदी समारंभात गोळीबार; मुलीचा मृत्यू, जावई गंभीर जखमी

| लोकमाध्यम न्यूज जळगांव दि. २७ : चोपडा शहरातील आंबेडकर नगर (खाई वाडा) परिसरात शनिवारी रात्री उशीरा प्रेमविवाहाच्या रागातून सेवानिवृत्त सीआरपीएफ बापाने आपल्या मुलीवर व जावयावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत मुलगी तृप्ती अविनाश वाघ (वय २४) हिचा जागीच मृत्यू झाला असून जावई अविनाश ईश्वर वाघ (वय २८) गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

प्रेमविवाहाचा राग जीवावर बेतला

तृप्ती आणि अविनाश यांचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र वडील किरण अर्जुन मंगले (वय ४८, रा. शिरपूर, जि. धुळे) यांना हा विवाह मान्य नव्हता. त्यामुळे राग मनात ठेवून ते चोपडा येथे अविनाशच्या बहिणीच्या हळदी कार्यक्रमात आले आणि तिथेच त्यांनी गोळीबार केला.

घटनेचा थरारक तपशील

समारंभ चालू असताना अचानक झालेल्या गोळीबाराने एकच गोंधळ उडाला. किरण मंगले यांनी प्रथम आपल्या मुलीवर गोळी झाडली, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जावई अविनाश याच्यावर गोळीबार करत त्याला गंभीर जखमी केले.

गोंधळात संतप्त वऱ्हाड्यांचा आरोपीवर हल्ला

घटनेनंतर संतप्त वऱ्हाड्यांनी आरोपी किरण मंगले याला पकडून बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. जखमी आरोपी आणि जावई अविनाश यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले.

पोलीस यंत्रणेकडून तातडीने कारवाई

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती.

या घटनेमुळे चोपडा शहरात भीतीचे व तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button