“सुरभी” तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त लघु उद्योग करणाऱ्या महिलांचा सत्कार

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव १० मार्च २०२५ |
सुरभी बहुुद्देशिय महिला मंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक संघ हॉल मध्ये महिलादींना निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.
सुरवातीला दीपप्रज्वलन , सरस्वती व अहिल्यादेवी होळकर ह्यांच्या प्रतिमेचे पूजन पा.प्रिती झारे, अध्यक्षा स्वाती कुळकर्णी, मानसी जोशी, निलिमा नाईक ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
नंतर उपस्थित महिलांच्या हस्ते केक कापण्यात आला.
प्रस्ताविक व प्रमुख पाहुण्या प्रिती झारे ह्यांचा सत्कार अध्यक्षा स्वाती कुलकर्णी ह्यांनी केला.राजमाता अहिल्यादेवी होळकर ह्यांच्या त्रिशताब्दी वर्षा निमित्त ” “ज्ञानयोगीनी अहिल्यादेवी” ह्या विषयावर प्रिती झारे ह्यांनी अहिल्यादेवींची महती तसेच त्यांच्या मध्ये असलेल्या विविध गुणांची माहिती सांगितली. एका महिले मध्ये काय काय गुण असू शकतात, व ती काय करू शकते ह्याविषयीं सविस्तर विचार मांडले.
महिला दिनानिमित्त ह्यावेळी ज्येष्ठ महिला मालती पिंपळीकर वय 88 ह्यांचा विशेष सन्मान करण्यात आलाज्या महिला संसारासाठी मदत व्हावी ह्या उद्देशाने घरगुती उद्योग करून स्वतःच्या पायावर उभे राहून संसाराला हातभार लावतत अशा ६ सुरभी सभासद उद्योजिकांचा सत्कार ह्यावेळी करण्यात आला.
सन्मानार्थी उद्योजिका
1 ऋचा मोहरीर ( सिद्धी फुड्स )
2 चैताली मोरदे ( महालक्ष्मी लेडीज वेअर )
3 स्वप्नगंधा जोशी ( जोशी गृह उद्योग )
4 मंजुषा अडावदकर ( मंजुषा इव्हेंट्स )
5 आदिती कुलकर्णी ( सौर दिवे )
6 पल्लवी देसाई ( स्वामी बॅग हाऊस )
ह्यावेळी मंजुषा ईव्हेंट्स तर्फे महिलांसाठी ‘ सेल्फी पॉईंट ‘ लावण्यात आला होता. सर्व महिलांनी सेल्फी काढून महिलादिन कार्यक्रम आनंदात साजरा केला.
सूत्रसंचालन व आभार अविता जोशी ह्यांनी मानले.
निलिमा नाईक, अश्विनी जोशी, मेघा नाईक, सुनीता सातपुते, मानसी जोशी, ज्योती भोकरडोळे, पूनम जोशी, आशा जोशी, स्मिता शुक्ल, रेवती शेंदुर्णीकर, संजीवनी नांदेडकर व ज्येष्ठ नागरिक संघ ह्यांनी सहकार्य केले.