ताज्या बातम्याजळगांव जिल्हा

ब्रेकिंग न्यूज : खदाणीच्या खोल पाण्यात बुडुन तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू!

| लोकमाध्यम न्युज | जळगाव  अमळनेर प्रतिनिधी| अमळनेर शहरात मंगळवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे. चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ असलेल्या पाण्याने भरलेल्या खदाणीत बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला.

मानव बंटी रतनानी, वय १४, कार्तिक विकी उधवानी, वय १४ आणि दिनेश विजय पंजवानी, वय १७ अशी मृत मुलांची नावे आहेत. तिघेही अमळनेरमधील सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी होते.

प्राथमिक माहितीनुसार, तिन्ही मुले मंगळवारी सायंकाळच्या सुमारास खदाण परिसरात गेली होती. पाण्यातून चालत ते एका उंचवट्यावर पोहोचले. यावेळी सेल्फी काढताना एकाचा पाय घसरल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्याने हात दिला, तर दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिसराही खोल पाण्यात ओढला गेला. काही क्षणांत तिघेही सुमारे ३० फूट खोल पाण्यात बुडाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या प्रयत्नांनंतर देवळी येथील दीपक मोरे यांनी पाण्यात उतरून तिघांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत तिन्ही मुलांचा मृत्यू झाला होता.

या हृदयद्रावक घटनेमुळे सिंधी कॉलनीसह संपूर्ण अमळनेर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button