अशोक लाडवंजारी यांची जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महानगर जिल्हा अघ्यक्ष म्हणून नियुक्ती!

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) : माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांचे अत्यंत विश्वासू व एकनिष्ठ कार्यकर्ते अशोक लाडवंजारी यांना बुधवार रोजी मुंबई प्रदेश कार्यालयात प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते , उपाध्यक्ष माजी आमदार सुनिल भुसारा , सरचिटणीस रविन्द्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महानगर जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.
अशोक लाडवंजारी यांनी दोन वर्षां पूर्वी महानगर अध्यक्ष म्हणून काम केले होते त्याची ही दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे ते माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांचे अत्यंत विश्वासू व एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. त्यांनी भाजपाचे माजी महानगर अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. अशोक लाडवंजारी पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे त्याना दुसऱ्यांदा महानगर अध्यक्ष ची जबाबदारी देण्यात आली आहे
अशोक लाडवंजारी हे नगरसेवक, जिल्हा नियोजन समिती,सदस्य मनपा स्थायी समिती सदस्य, मनपा शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणून राहिले आहेत, नाथ फाऊंडेशन अघ्यक्ष, श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालय चे सचिव म्हणूनही काम पाहत आहेत , नाथ फाऊंडेशन च्या माध्यमातून गोर गरीब नागरिकांना कपडे, ब्लँकेट वाटप , अन्नदान , शालेय विद्यार्थी / विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य , गरजूं महिलांना साड्या वाटप असे अनेक उपक्रम राबविले आहेत.
अशोक लाडवंजारी यांची महानगर अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यात चैतन्य निर्माण झाले असून आपल्या नेतृत्वगुण, उत्कृष्ट संघटनकौशल्य आणि पक्षाप्रती असलेल्या निष्ठेच्या बळावर आपण जळगाव शहर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांची संघटना अधिक सक्षम, गतिमान आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे कार्य करु, असा मला ठाम विश्वास व्यक्त करत आपण जळगाव शहर जिल्ह्यात पक्षसंघटना अधिक बळकट करणार असल्याचे सांगितले.
या निवडीबद्दल आमदार एकनाथराव खडसे , महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष रोहिणीताई खडसे खेवलकर , माजी खासदार ईश्वरलालजी जैन , प्रदेश सरचिटणीस ॲन्ड रविन्द्र पाटील , ग्रामीण जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील , माजी आमदार संतोष चौधरी , डॉ बी एस पाटील , जिल्हा निरीक्षक भास्कराव काळे , प्रदेश चिटणीस ईजाज मलिक , धुळे जिल्हा निरीक्षक दिलीप खोडपे सर , जिल्हा सरचिटणीस वाय एस महाजन सर , महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्ष कल्पिता पाटील , मंगला पाटील अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाअध्यक्ष मजहर पठाण , समन्वयक विकास पवार , माजी नगरसेवक राजु मोरे , सुनिल माळी , जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत , कार्याध्यक्ष डॉ संग्रामसिंह सुर्यवंशी युवक महानगर अध्यक्ष विनायक पाटील , माजी महानगर अध्यक्ष रिंकू चौधरी , सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष सुरेश पगारे , विद्यार्थी आघाडी चे जिल्हा अध्यक्ष गौरव वाणी यांनी अभिवादन केले.
अशोक लाडवंजारी यांनी प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी जी जबाबदारी दिली ती पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घरा घरात ,वार्डा वार्डात राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार याचे विचार पोहचवून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.






