जळगावसामाजिकसांस्कृतिक

सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची पत्रकार परिषदेत स्पष्टोक्ती !

| लोकमाध्यम न्युज |जळगाव : जळगाव शहरात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळामध्ये फूट पडल्याचे चुकीचे चित्र निर्माण केले जात असल्याचा दावा करत ‘डॉ.अविनाश आचार्य प्रणित सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळा’तर्फे बुधवारी (९ सप्टेंबर) रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महामंडळाचे नूतन अध्यक्ष मुकुंद मेटकर यांनी स्पष्ट केले की, महामंडळात वर्षांनुवर्षे अनेक कार्यकर्ते सेवाभावी वृत्तीने आणि एकदिलाने काम करत आहेत. असे असताना काही लोकांकडून चुकीच्या पद्धतीने फूट पाडण्याचे प्रयत्न होत आहेत.पत्रकार परिषदेत नूतन पदाधिकाऱ्यांनी व ज्येष्ठ सदस्यांनी महामंडळाची भूमिका मांडली.

सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची सुरुवात आदरणीय अविनाश दादा आचार्य यांनी केली होती. त्यांच्या नावाचा गजर आम्ही महामंडळाच्या माध्यमातून करत आहोत. सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येऊन आपले सण साजरे केले पाहिजेत. “डॉ. अविनाश आचार्य यांनी गणेत्सवाची विस्कळीत घडी बसवून मिरवणुका सुरळीत केल्या होत्या. सर्व गणेशोत्सव मंडळांनी एकाच मंचाखाली येऊन धार्मिक व सामाजिक कार्यातून जळगावला पुढे नेले पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून एकच व्यक्ती प्रमुख पदावर होती, ज्याला कोणी विरोध केला नाही. मात्र, नवीन नेतृत्वालाही संधी मिळाली पाहिजे ही सर्व मंडळांची भावना होती. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सदस्य मुकुंद मेटकर यांची अध्यक्षपदी तर दीपक जोशी यांची कार्याध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे, अशी माहिती दिली.

दरवर्षी नवीन नेतृत्वाला संधी देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. लवकरच विविध समित्या गठीत करून त्यात इतर कार्यकर्त्यांचा समावेश केला जाईल. महामंडळासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांवर खालच्या पातळीवर आरोप होणे चुकीचे आहे. योगी दत्तनाथ महाराज (आदेश) यांनी सांगितले की, जळगावला धार्मिक व सामाजिक क्षेत्रात उंचावर नेण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे.

डॉ. अविनाशदादा आचार्य प्रणित सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची आज बुधवार दि. ९ सप्टेंबर रोजी बैठक झाली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये यंदाच्या गणेशोत्सवात महामंडळ म्हणून सर्व गणेश मंडळांशी संपर्क राहील. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महामंडळ तत्पर राहील व कायम बांधिल राहील. पदासाठी हिंदू बांधवांमध्ये व मंडळांमध्ये वाद नको म्हणून यंदा तटस्थ भूमिका जाहीर करीत आहोत, असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button