शिवसेना (ऊबाठा) आयोजित भगवा सप्ताह अंतर्गत शेतकरी संवाद अभियान
उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वात दि.५ ऑगस्ट रोजी अभियानास सुरुवात
लोकमाध्यम न्युज | जळगांव दि. ४ ऑगस्ट २०२४ |
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभरात भगवा सप्ताह आयोजित करण्यात आला असून माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वात उद्या सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता गोरखपूर (पिंपरखेड तांडा) ता.चाळीसगाव येथून शेतकरी संवाद अभियानास सुरुवात होणार आहे. या अभियानात शेतकरी संवाद,शिवसैनिक संघटन,मशाल रॅली,गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक, शाखा उद्घाटन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या अविस्मरणीय शेतकरी संवाद अभियान कार्यक्रम माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वात शिवसैनिक,पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार असून
या अभियानात सोमवार दि.५ ऑगस्ट
सकाळी ७ वाजता गोरखपुर (पिंपरखेड तांडा),32 नंबर तांडा,वलठाण तांडा,वलठाण गाव,पाटणा,चंडिकावाडी दुपारी ४ वाजता जूनपाणी,चत्रभुज तांडा,शिंदी,ओढरे,गणेशपूर (सभा) या ठिकाणी शाखा उद्घाटन सोहळा, शेतकरी संवाद अभियानास आवर्जून उपस्थीत राहावे असे आवाहन रमेश आबा चव्हाण,तालूका प्रमूख चाळीसगाव. नानाभाऊ कुमावत शहर प्रमूख चाळीसगाव, चाळीसगाव तालुका व शहर शिवसेना युवा सेना, महीला आघाडी पदाधिकारी शिवसैनिक चाळीसगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.