जळगावक्राईमपोलीस

एम.आय.डी.सी. पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; १८ हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत!

CEIR पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने ३ लाख रुपयांचे मोबाईल हस्तगत; जळगाव पोलिसांच्या विशेष मोहिमेला यश

| लोकमाध्यम News | जळगाव  (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी हरवलेले व गहाळ झालेले मोबाईल फोन शोधून ते मूळ मालकांना परत मिळवून देण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पोलिसांनी एकूण १८ मोबाईल फोन शोधून हस्तगत केले असून, या मोबाईलची अंदाजित किंमत ३ लाख रुपये आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे मोबाईल हरवलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना नागरिकांचे हरवलेले व गहाळ झालेले मोबाईल फोन शोधून मूळ मालकांना परत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या पथकाने विशेष मोहीम राबवून मोबाईल शोधण्याची कारवाई केली.या मोहिमेत CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टल तसेच तांत्रिक विश्लेषणाचा प्रभावी वापर करण्यात आला. मोबाईलच्या तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर हे मोबाईल हस्तगत करून संबंधित नागरिकांना परत देण्याची कार्यवाही करण्यात आली.

या मोहिमे दरम्यान पोलीस पो.हे.कॉ.मोतीलाल विठ्ठल बोरेसे, पो. कॉ. प्रमोद लाडवंजारी तसेच महिला पोलीस अंमलदार रामकला राठोड यांनी तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक  बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक  चंद्रकांत धनके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक  विजयसिंग पाटील, पो.हे.कॉ. मोतीलाल विठ्ठल बोरसे, पो.हे.कॉ. प्रमोद लाडवंजारी व म.पो.अं. / रामकला राठोड यांनी ही मोहीम यशस्वी केली.

हरवलेले मोबाईल शोधून ते नागरिकांना परत मिळवून देण्याच्या या कामगिरीमुळे जळगाव पोलिसांच्या तांत्रिक तपास कौशल्याचे आणि नागरिकांप्रती असलेल्या बांधिलकीचे दर्शन घडले आहे. पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button