जळगांव जिल्हाक्राईमताज्या बातम्या

भोकर येथील स्टेट बँकेत भरदिवसा सशस्त्र दरोडा; लाखोंची रोकड लंपास!

गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे तीन संशयित आरोपी जेरबंद; रोकड आणि बॅगा पोलिसांच्या ताब्यात, अन्य आरोपींचा शोध सुरू

| लोकमाध्यम News | जळगाव (प्रतिनिधी –) : जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत भरदिवसा शस्त्राचा धाक दाखवून लाखो रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी दाखविलेली सतर्कता आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे तीन संशयित आरोपींना पकडण्यात यश आले असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी तीन वाजेच्या सुमारास काही दरोडेखोर भोकर येथील स्टेट बँकेच्या शाखेत शिरले. त्यांनी बँकेत उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून धमकावले आणि बँकेतील रोकड लुटली. त्यानंतर रोकड आणि बॅगा घेऊन आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, बँकेत दरोडा पडल्याची माहिती गावात पसरताच नागरिकांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. काही गावकऱ्यांनी आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग केला. यावेळी पळून जाणाऱ्या आरोपींपैकी एक जण विदगावजवळ नागरिकांच्या हाती लागला. संतप्त नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.या घटनेनंतर पोलिसांनीही तातडीने तपासाची चक्रे फिरवली. गावकरी आणि पोलिसांच्या मदतीने आतापर्यंत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. तसेच दरोडेखोरांनी लुटलेली रोकड आणि बॅगाही पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

मात्र, या दरोड्यात सहभागी असलेले आणखी काही आरोपी फरार असल्याने पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. भरदिवसा बँकेत घुसून शस्त्राच्या धाकावर दरोडा टाकण्याच्या या घटनेमुळे बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या दरोड्यात नेमकी किती रक्कम लुटण्यात आली, किती जणांचा सहभाग होता आणि फरार आरोपी कोण आहेत, याचा पुढील तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती समोर येणार आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button