जळगावसांस्कृतिक
श्री शिवरत्न प्रतिष्ठान जळगाव व आमदार राजू मामा भोळे यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात एक अनोखा उपक्रम
मी येतोय "स्वराज्य हे सुराज्य व्हावे" या साठी :स्व.शिवशाहीर दादा नेवे यांच्या जयंती निमित्त आयोजन
लोकमाध्यम न्युज | जळगाव ३० सप्टेंबर २०२४ |
छत्रपती शिवाजी महाराज समाजातील आजच्या विदारक परिस्थितीवर जनतेशी संवाद साधणार आहे अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे.
समाजातील सध्या वाईट घडत असलेल्या घटना लक्षात घेता, आता मात्र महाराजांनीच यावे आणि जनतेला संदेश द्यावा या भावनेतून हा उपक्रम होत आहे.
राजा रयतेचा हे महानाट्य श्री शिवरत्न प्रतिष्ठान जळगाव ने उभे केले असून त्यांचाच अनोखा उपक्रम पुन्हा एकदा ते जळगाव शहरासाठी आणत आहेत.
२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७.०० वाजता कोर्ट चौक, छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम होणार असून, जळगाव शहरवासीयांनी या अनोख्या कार्यक्रमास अभूतपूर्व संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार राजु मामा भोळे तसेच शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.