लोकमाध्यम न्युज | जळगाव १० ऑक्टोबर २०२४ |
भारतीय टपाल विभाग आयोजित युनिव्हर्सल पोस्टल युनियन आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल कु. सलोनी ज्ञानेश्वर घुगे हिचा व तिचे वडील रिक्षाचालक असून त्यांचा सुद्धा सत्कार संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.
वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष तथा मा. नगरसेवक प्रशांत नाईक यांनी सत्कार केला. कु.सलोनी ज्ञानेश्वर घुगे ह्या वंजारी समाजातील लेकीने राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त करून राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला आहे. अशा सर्व लेकरांचा सत्कार करणे हे आमचे परमभाग्य व कर्तव्य आहे .असे प्रशांत नाईक यांनी सांगितले. उपाध्यक्ष नामदेव वंजारी, उमेश वाघ, सुधीर नाईक ,दिनेश नाईक , योगेश घुगे यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला. सलोनी ला वंजारी युवा संघटनेतर्फे भावी वाटचालीसाठी तिला सन्मानपत्र व सत्कार करून रोख पारितोषिक देण्यात आले.