भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
जळगांव दि.१४ : ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला, कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला, ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला.. बाबासाहेबांनी दलित वर्गाला समाजात समानता मिळवून देण्याबरोबरच त्यांनी समाजसुधारणेसाठीही अनेक कामे केली.भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार मानले जाणारे डॉ.भीमराव आंबेडकर हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची व्यक्ती, एक न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक देखील होते. ज्यांनी दलित यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी, महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी आपले जीवन समर्पित केले.
अशा या महामानवाला आज भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय जी.एम फाउंडेशन येथे पुष्पहार घालून
१३३ व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी लोकसभेचे उमेदवार स्मिता वाघ, आमदार राजू मामा भोळे, जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, माजी महापौर सीमा भोळे, सरचिटणीस अरविंद देशमुख, विधानसभा निवडणुक प्रमुख विशाल त्रिपाठी, महेश जोशी, सुनील खडके, राजेंद्र मराठे, उदय भालेराव, मुकुंद मेटकर, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील, नीला चौधरी, दीपमाला काळे, सुचिता हाडा, गायत्री राणे, नंदिनी दर्जी, ज्योती निंभोरे, केतकी पाटील, चित्रा मालपाणी, राजू मराठे, राहुल पाटील, मंडल अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी प्रसिध्दी प्रमुख मुविकोराज कोल्हे आदी उपस्थित होते.