भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव निमित्त ५ दिवस भरगच्च कार्यक्रम
समिती अध्यक्ष पारस राका व स्वरूप लूंकड यांची पत्रकार परिषदेत माहिती
जळगाव दि.१९ : श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव स समितीतर्फे १८ ते २२ एप्रिल दरम्यान शासनपती श्रमण भगवान महावीर स्वामी यांच्या २६२३ जन्म कल्याणक महोत्सवाला गुरुवार दि. १८ पासून सुरूवात झाली आहे. यंदा महावीर जन्मकल्याणकला दि. २१ रोजी खान्देश सेंट्रल प्रांगणात सकाळी ९.४५ वाजता पद्मभूषण आचार्य भगवंत प.पू.
विजय रत्नसुंदर सुरीश्वरजी म.सा. यांची विशेष उपस्थिती व उद्बोधन लाभणार असल्याची माहिती समितीचे स्वरूप लुंकड आणि अध्यक्ष पारस राका यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महोत्सवाची माहिती देण्यासंदर्भात गुरुवार दि.१८ रोजी महोत्सव समितीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी समितीचे स्वरुप लुकंड, श्रेयश कुमट, अनिल जोशी किशोर कुळकर्णी उपस्थित होते.
महोत्सवातील कार्यक्रमासाठी माजी मंत्री सुरेशदादा जैन, सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलीचंद जैन यांचे मार्गदर्शन असणार आहे. तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार ईश्वरलाल ललवाणी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, नयनतारा बाफना, माजी महापौर रमेशदादा जैन, उद्योगपती रजनीकांत कोठारी, माजी महापौर प्रदीप रायसोनी, उद्योगपती अजय ललवाणी, गौतम प्रसादी लाभार्थी कांताबाई इंदरचंद छाजेड उपस्थित असतील.
२० एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते ८.३० स्वाध्याय भवन येथे सम्यक महिला मंडळा तर्फे सामूहिक सामायिक मध्ये ‘प्रभू महावीरः कल, आज और कल’ या विषयावर वक्ते आदर्श जैन यांचे मनोगत होईल. दुपारी २.०० ते सायंकाळी ७.०० पर्यंत खान्देश सेंट्रल प्रांगण येथे वीरति वृंद द्वारा कार्निवल, सायंकाळी ७.०० ला श्री सकल जैन भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती २०२४ द्वारा स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे होईल. याकार्यक्रमानंतर ७.३० पासून सदाग्यान भक्ती मंडळ, अन्य महिला मंडळाद्वारे लगेच विविध नाविण्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांची प्रस्तुती होईल.
२१ एप्रिल रोजी महावीर जन्मकल्याणक दिनी सकाळी ७.१५ वाजता शहरातील श्री वासुपुज्यजी जैन मंदीर प्रांगण येथे सकल श्री संघाद्वारे जैन ध्वजवंदन होईल. तेथूनच सकाळी ७.३० वाजता जैन युवा फाउंडेशन द्वारा आयोजित भव्य अशा शोभायात्रेस (वरघोडा) आरंभ होईल. टॉवर चौक, गांधी मार्केट, सुभाष चौक, दाणाबाजार, सारस्वत चौक, जयप्रकाश नारायण चौक, नेहरू चौक मार्गे खान्देश सेंट्रल प्रांगणात समापन होईल. सकाळी जय आनंद ग्रुप तर्फे ८.४५ पासून आयोजित रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन आहे. सकाळी ९.०० वाजता जैन ध्वजवंदना व मुख्य समारंभास सुरुवात होईल. सकाळी ९.४५ वाजता आचार्य भगवंत पद्मभूषण प.पू. विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांचे विशेष प्रासंगीक उद् बोधन लाभेल. सकाळी ११.१५ ला सामुहीक प्रसादी असून त्याचे लाभार्थी श्रीमती कांताबाईजी इंदरचंदजी छाजेड परिवार आहे. सायंकाळी ७.३० वाजेपासून वीतराग भवन, लाल मंदीर शिवाजी नगर येथे महावीर दिगंबर चैत्यालय ट्रस्ट द्वारा भगवान महावीर स्वामी झुला उत्सव होईल.
महावीर जन्मकल्याण निमित्ताने जैन इरिगेशन तर्फे काव्य रत्नावली चौकाची सजावट करण्यात येणार असून व.वा. वाचनालयाच्या प्रांगणात गरजूंसाठी भोजन देण्यात येणार आहे. या सोबतच विविध संस्थां तर्फे शहरातील विविध चौक सुशोभित केले जाणार आहेत. सर्व कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे विनम्र आवाहन भगवान महावीर जन्मकाल्याक समितीचे अध्यक्ष श्री पारस राका यांनी केले.
२२ एप्रिल रोजी आचार्य भगवंत प.पू. १००८ श्री रामलालजी म.सा. यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने सकाळी ७ वाजता समता युवा संघा तर्फे सिव्हिल हॉस्पीटल मध्ये रुग्णांसाठी फळ वाटप, १०.३० ते ११.०० साधुमार्गी जैन संघा द्वारे स्वाध्याय भवन येथे नवकार महामंत्र जापने या महोत्सवाचा समारोप होणार आहे.
या कार्यक्रमासाठी माजी मंत्री समाजरत्न, समाज चिंतामणी सुरेश दादा जैन त्याच प्रमाणे सकल जैन श्री संघ अध्यक्ष दलीचंदची जैन यांचे मार्गदर्शन असून सन्माननीय अतिथी म्हणून मा. खा. ईश्वरबाबुजी ललवाणी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, नयनतारा बाफना, माजी महापौर रमेशदादा जैन, उद्योगपती रजनीकांत कोठारी, माजी महापौर प्रदीप रायसोनी, उद्योगपती अजय ललवाणी, गौतम प्रसादी लाभार्थी कांताबाई इंदरचंदजी छाजेड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कस्तुरचंदजी बाफना (कार्याध्यक्ष, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ), ललित लोडाया (अध्यक्ष, श्री जैन श्वेतांबर मूर्तीपुजक संघ), राजेश जैन (अध्यक्ष, श्री महावीर दिगंबर जिनतैत्यालय ट्रस्ट), जितेंद्र चोरडिया (अध्यक्ष, श्री. जैन श्वेतांबर तेरापंथ सभा) श्री. स्वरुपभाई लुंकड यांचे मोलाचे योगदान लाभत आहे.