जळगांव जिल्हासामाजिक

भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने जिल्ह्यातील बंधारा,तलाव,नाल्यातील गाळ काढला जाणार

बीजेएस कार्यकर्ते आणि जिल्हाधीकारीं यांचे बैठकीत या वर्षी तलावातील गाळ काढणे बाबत झाला निर्णय

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव ६ मार्च २०२५ |

भारतीय जैन संघटना व  जिल्हाधीकारी आयुष प्रसाद यांच्या सोबत झालेल्या बैठकीत गाळयुत्त शिवार व गाळ मुक्त बंधारा/धरण, नाला खोलीकरण यां विषयांवर सविस्तर चर्चा संपन्न झाली.

या चर्चेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जल संधारण विभागाचे अधिकारी व इतर संबंधित अधिकारी , तसेच भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विनय पारख, जैन इरिगेशनचे अनिल जैन, BJS जलप्रकल्प जिल्हा प्रमुख सुमीत मुणोत, जलंगाव तालुका प्रमुख पंकज जैन ,रावेर तालुका प्रमुख देवेंद्र शाह व उज्वल देरेकर , भुसावळ तालुका प्रमुख चेतन जैन, धरणगांव तालुका प्रमुख नीलेश ओस्तवाल व BJS जळगांव अध्यक्ष अजय राखेचा, bjs जलकार्य जिल्हा समन्वयक गणेश कोळी यांचे सोबत चर्चा संपन्न झाली. १५ तालुक्यातील bjs चे सर्व पदाधिकारी शेतकरी बांधवां पर्यन्त पोहोचून तलावातील गाळ शेतात घेवून जाणे साठी प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य करण्यासाठी तयार आहेत अशी हमी विनय पारख यांनी दिली.लवकरच प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार आणि बिडिओ आणि सरपंच यांचे सोबत मीटिंग घेताना bjs च्या कार्यकर्त्यांना आमंत्रित करावे असे जिल्हयाधिकाऱ्यांनी सांगितले. अशी माहिती भारतीय जैन संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विनय पारख,पंकज जैन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button