निवडणुकीत जात-धर्म आणणारे नामर्दाची औलाद : आ.बच्चू कडू
प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अनिल चौधरी यांच्या प्रचार सभेत जोरदार टीकास्त्र
लोकमाध्यम न्युज | जळगांव १७ नोव्हेंबर २०२४ |
रावेर, दि.१६ – अनिल चौधरी एक सच्चा कार्यकर्ता आहे. अनेकदा विविध मागण्यांसाठी ते प्रयत्नशील राहिले. जे नामर्दाची औलाद असतात तेच निवडणुकीत धर्म आणि जात आणतात. काम करणारा कधीही जात-पात आणत नाही. इथ पंजावाला कुठे गायब आहेत त्याला पहिले शोधा, इतका झोपणारा माणूस मी आजवर पाहिला नाही. भाजपवाले तर फक्त धर्माचे नाव करून मते मागताय पण जनता त्यांना मतपेटीतून उत्तर देणार असल्याचे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आ.बच्चू कडू यांनी केले.
रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांच्या प्रचारार्थ आ.बच्चू कडू यांची रावेर येथे भव्य सभा आयोजित केली होती. त्यासभेत त्यांनी महायुती आणि महाआघाडीचा खरपूस समाचार घेतला. सभेला मोठ्यासंख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.
आम्ही धर्माच्या नव्हे सेवेच्या नावाने मते घेतो
आ.बच्चू कडू म्हणाले की, गेल्या ७५ वर्षात काँग्रेस आणि भाजपने आलटून पालटून सत्ता भोगली मात्र आजपण आमच्या शाळा चांगल्या झाल्या नाही. आम्ही कोणत्याच नेत्यांना घाबरत नाही, आम्हाला कोणतीही चिंता नाही. मी जनतेसाठी ३५० गुन्हे दाखल करून घेतले. ७५ वर्षात तुम्ही शाळा चांगली करू शकले नाही. लाज नाही वाटत का? इथे आर्थिक विषमता वाद सुरू आहे. श्रीमंत आणि गरीबाची शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था वेगवेगळी आहे. भाजप-काँग्रेसवाले धर्माच्या नावाखाली मते घेतात मी सेवेच्या नावाने मते घेतो, असे ते म्हणाले.
अनिल चौधरी झाले भावूक, रावेरला शांततामय करणार
मी मतदार संघात एक-एक कार्यकर्ता जोडला. सर्वसामान्य कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडे गाडीत पेट्रोल भरायला देखील पैसे नसतात, असे बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अनिल चौधरी भावूक झाले. माझ्या कार्यकर्त्यांना आर्थिक आमिष दाखवले जातात मात्र तो विकला जाणार नाही. माझ्यासमोर बसलेला जनसमुदाय माझा धर्म आणि समाज आहे. तरुणांना खोट्या गुन्ह्यात अडकवले जाते. धर्म, जातीचे राजकारण घराणेशाहीने सुरू केले आहे. रावेर पोलीस ठाण्यात गुन्हेच दाखल होणार नाही इतकी शांतता होईल. रावेरमध्ये नेते भाजप, काँग्रेस मिळून जातीवाद करतात. रावेरचा कोणताही विकास झालेला नाही. आज इथे जमलेली जनता पैसे देऊन आणलेली नाही. काही लोक माझी बदनामी करतात. भविष्यात आणखी अफवा पसरवतील मात्र त्यावर विश्वास न ठेवता दि.२० रोजी अनुक्रमांक ४ बॅट चिन्हासमोरील बटण दाबून मला प्रचंड मताने विजयी करा, असे आवाहन अनिल छबिलदास चौधरी यांनी केले.
आम्ही कार्यकर्त्यांना संस्थानिक करू : संतोष चौधरी
गेल्या पंचवार्षिकला आमची टेस्ट मॅच होती यंदा वन डे आणि टी ट्वेंटी सामना आहे. मी पहिल्यांदा अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली तर ३३ हजार मते मिळाली होती, अनिल भाऊंना तर ४५ हजार मते मिळाली. ५ वर्षात अनिल चौधरींनी अनेक लोकांना जोडले, आज गावागावात त्यांचे समर्थक आहेत. स्थानिक नेत्यांनी आजवर केवळ स्वतःचा स्वार्थ साधला. स्वतःच्या संस्था मोठ्या केल्या. आम्ही कधीही संस्था उभारल्या नाही. भविष्यात देखील संस्था उभारणार नाही, पण कार्यकर्त्यांना संस्थानिक करू, असा शब्द माजी आ.संतोष चौधरी यांनी दिला.
यांची होती उपस्थिती
प्रचारात फिरोज शेख, गणेश बोरसे, राम कुकडे, गोकुळ कोळी, कल्पेश खत्री, करीम मन्यार, भरत लिधुरे, विलास पांडे, बिलाल शेख, तुकाराम बारी, नंदकिशोर सोनवणे, विकास पाटील, खेमचंद कोळी, सचिन झाल्टे, लतीफ खान, शुभम पाटील, सागर चौधरी, मनोज करंकाळ, दिलीप बंजारा, विनोद कोळी, अनिल चौधरी, अय्युब पहेलवान, मोहसीन शेख, विजय मिस्तरी, रवी महाजन, हाजी हकीम सेठ, राकेश भंगाळे, अनंत जोशी, बंटी मंडवाले, विक्की काकडे, सचिन कोळी, रमजान तडवी, रोनक तडवी, सुधाकर भिल्ल, सचिन महाजन, संतोष चौधरी, चेतन वायकोळे, गोलू मानकर यांच्यासह रावेर व यावल तालुक्यातील पदाधिकारी व परिवर्तन महाशक्तीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.