जळगांव जिल्हाव्यावसायिक

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ची विशेष उपस्थिती; जळगावात अशोक लेलँडच्या ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ या नव्या शोरूमचे भव्य उद्घाटन

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. २९ ऑक्टोंबर २०२५ : शहरात हिंदूजा समूहाच्या अशोक लेलँडचे जळगावचे अधिकृत सेल्स व सर्व्हिस पॉईंट म्हणून ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ या अत्याधुनिक लाईट कमर्शियल व्हेइकल्स शोरूमचे भव्य उद्घाटन उद्या गुरुवारी, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. अशोक लेलँड लिमिटेडचे LCV प्रमुख श्री. विप्लव शाह यांच्या शुभहस्ते हा शानदार सोहळा संपन्न होणार असून, कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणून महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची सुद्धा विशेष उपस्थिती लाभणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

एमआयडीसी परिसरातील मारुती सुझुकी शो-रूमसमोर अजिंठा रोडवर स्थित G-5/1 येथे उभारण्यात आलेल्या या भव्य शोरूममुळे अशोक लेलँडचे ‘साथी’ हे वाहन ग्राहकांसाठी प्रथमच उपलब्ध झाले आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील तसेच परिसरातील व्यावसायिक, वाहतूकदार व शेतकऱ्यांना ‘साथी’, ‘दोस्त’ आणि ‘बडा दोस्त’ यांसारखी अशोक लेलँडची लोकप्रिय वाहने खरेदी करणे सोपे होणार आहे. या ठिकाणी ग्राहकांना विक्रीची सेवा दिली जाणार असून एमआयडीसी परिसरातील रेमंड कंपनीच्या मागे स्थित E-8 येथे अशोक लेलँड वाहनांचे उत्कृष्ट सर्व्हिसिंग आणि वाहनाचे ओरिजिनल सुटे भाग (Spares) अशा सर्व सुविधा मिळणार असल्याने त्यांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वास अयांश ऑटोमोबाईल्सचे संचालक यश सुनील मंत्री यांनी व्यक्त केला आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button