स्वातंत्र्य दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते

नागरिकांना समारंभांस उपस्थित राहण्याचे आवाहन
| लोकमाध्यम न्युज | जळगाव, दि. १४ : भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन समारंभानिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम शनिवार , दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास जळगाव शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या पत्नी व आई-वडील, स्थानिक शासकीय व निमशासकीय अधिकारी तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३५ ते ९.३५ वाजेपर्यंतच्या कालावधीत इतर कोणताही शासकीय अथवा निमशासकीय समारंभ आयोजित करू नये. एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ आयोजित करावयाचा असल्यास तो सकाळी ८.३५ वाजेपूर्वी किंवा सकाळी ९.३५ वाजेनंतर आयोजित करावा, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविले आहे.





