जळगावस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

राष्ट्रवादी काँग्रेस ३५ ते ४० जागांची मागणी करणार : माजी मंत्री अनिल पाटील 

भाजपच्या स्थानीक नेत्यांशी २३ डिसेंबरला बोलणी

| लोकमाध्यम न्युज जळगाव | दि. २० डिसेंबर २०२५ :  जळगाव महापालिका निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणून भाजप-शिवसेनेसोबतच महायुती करूनच निवडणुक लढविणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे १९ प्रभागात उमेदवारांनी लढण्याची तयारी दर्शविली आहे. जो उमेदवार निवडून येण्यास सक्षम आहे अशानांच आम्ही उमेदवारी देणार आहे. महायुती जागा वाटपाबाबत भाजपच्या जळगाव जिल्ह्यातील नेत्यांशी प्राथमिक बोलणी झाली आहे. मात्र जागा वाटपाबाबत अंतीम निर्णय २३ डिसेंबरला एकत्रीत बैठकीत होइल. त्या जागा वाटपाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस ३५ ते ४० जागांची मागणी करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार अनिल पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.गणेश कालनीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत  माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा चेअरमन संजय पवार, माजी आमदार मनिष जैन, महिला आघाडीच्या प्रतिभा शिंदे,   जिल्हाध्यक्ष महानगर अभिषेक पाटील, रविंद्र पाटील आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेशाध्यक्षांच्या सूचने नूसारच महायुतीद्वारे आम्ही जळगाव महापालिका निवडणूक लढणार आहोत. भाजप आम्हाला सन्मानजनक जागा देतील. त्याठिकाणी आम्ही निवडून येणारे सक्षम उमेदवार उभे करू.

गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इच्छूकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. आतापर्यंत १९ प्रभागातून ७९ उमेदवारा अर्ज आले आहे. जागा वाटपाबाबत भाजप-शिवसेनेच्या नेत्यांशी प्राथमीक बोलणी झाली आहे. त्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजूमामा भोळे यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी पालिका निवडणूकीच्या निकालानंतर आम्ही तिघा पक्षांचे नेते बसू व जागा वाटपाचा निर्णय घेवू असे सांगण्यात आले आहे. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याशी बोलणे झालेले नाही. तेही लवकरच होइल.

भाजपने जागा वाटप बैठकीत सन्मानपूर्वक जागा नाही दिल्या तर त्याचा स्वीकार करणार की स्वतंत्रपणे लढणार असे विचारले असता, माजीमंत्री पाटील म्हणाले, की अगोदर जागा वाटप तर होवू द्या. राज्यस्तरावरूच महायूतीद्वारे महापालिका लढविण्याचे आदेश आहेत. जर स्थानीक स्तरावर जागा वाटपाची बोलणी फिस्कटली, सन्मानजनक जागा दिल्या गेल्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाच्या सूचने नंतर पुढील निर्णय घेवू. आताच स्वबळाबाबत सांगता येणार नाही

पालिका, नगरपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल उद्या (ता.२१) आहे. राष्ट्रवादी कांग्रेसने सहा पालिकेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिले आहेत. सुमारे ऐंशी ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार दिले आहेत. त्यात राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल. तो निकाल हाती आला की आमची ताकद वाढलेली असेल, असे पाटील यांनी सांगितले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button