प्रा.शमा सुबोध सराफ यांना पुत्रशोक ; अर्णव सराफ यांचे अमेरिकेत निधन

|लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. १ जानेवारी २०२६ : जळगाव येथील मुळजी जेठा महाविद्यालयातील प्राध्यापिका शमा सराफ व जैन उद्योग समूहातील निवृत्त अधिकारी सुबोध सराफ यांचे सुपुत्र अर्णव सराफ (वय 26) यांचे दुःखद निधन झाले.
अर्णव हे गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकेत होते. तेथील संध्याकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता त्यांचे निधन झाले. सुबोध व शमा सराफ हे मुंबई येथून अमेरिकेकडे रवाना झाले असून अर्णव यांच्यावर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अमेरिकेतील प्रचंड थंडी सहन न झाल्याने रक्तदाब कमी झाल्यामुळे अर्णवचे निधन झाले. अर्णव यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. सुबोध व शमा सराफ हे जळगावातील सामाजिक चळवळीत नेहमीच अग्रभागी असतात, रोटरी क्लबच्या माध्यमातून ते सक्रिय असून सुबोध सराफ प्रसिद्ध कलाकार-चित्रकार आहेत. अर्णव यांच्या निधनाचे वृत्त कळताच नातेवाईक मित्र परिवार यांनी जळगाव येथील निवासस्थानी गर्दी केली होती.







