महिला मतदारांनी सुशिक्षित आणि प्रगल्भ नेतृत्वाला मतदान करावे – डॉ.लीना पाटील
लोकमाध्यम न्युज | जळगांव १२ नोव्हेंबर २०२४ |
जळगाव शहरात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी शहरात जागरूक महिलांची बैठक आयोजित करण्यात होती. या बैठकीत डॉ. लीना पाटील यांनी महिलांना जागरूक मतदार बनण्याचे आवाहन केले. त्यांनी महिलांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्यांना विशेषत: महिला मतदारांना डॉ. अनुज पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
महिलांचा मताचा अधिकार हे त्यांच्या सक्षमीकरणाचे प्रतीक आहे असे प्रतिपादन करताना डॉ. लीना पाटील यांनी स्पष्ट केले की महिला मतदारांनी सुशिक्षित आणि प्रगल्भ विचारांच्या उमेदवारालाच निवडून द्यावे, जो समाजाच्या विकासासाठी बांधील असेल. त्यांच्या मते, डॉ. अनुज पाटील हे सुशिक्षित असून त्यांच्या नेतृत्वात समाजाचे सर्वांगीण भले होईल.
बैठकीला उपस्थित महिलांनी डॉ. लीना पाटील यांच्या या विचारांना जोरदार प्रतिसाद दिला आणि महिलांच्या मताधिकाराचा सकारात्मक वापर करून एक आदर्श नेते निवडण्याची शपथ घेतली.
दरम्यान डॉक्टर लीना पाटील या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव शहरातील अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या सुविद्य पत्नी आहेत.
डॉ. लीना पाटील या विविध सामाजिक संस्थांसोबत पण शहरात गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय आहेत. त्यांनी महिलांची स्वतंत्र फळी निर्माण केली असून डॉक्टर पाटील यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले आहे.