जळगावमहापालिका निवडणुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ६ जानेवारीला जळगावात भव्य रोड शो

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. ५ जानेवारी २०२६ : जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने निर्णायक आघाडी घेण्याच्या दृष्टीने प्रचाराचा वेग वाढवला असून, या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा भव्य रोड शो जळगाव शहरात आयोजित करण्यात आला आहे. या रोड शोमुळे महायुतीच्या प्रचाराला नवी उर्जा मिळणार असून, शहराच्या राजकीय वातावरणात प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.

हा रोड शो दुपारी ठीक ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू होणार असून, तो नेहरू चौक – लालबहादूर शास्त्री टॉवर – चित्रा चौक – गोलाणी मार्केट या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथेच समारोप होणार आहे. या मार्गावर मुख्यमंत्री फडणवीस नागरिकांशी थेट संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करणार आहेत.

महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या महायुतीने एकत्र येत ताकद दाखवली आहे. या रोड शोमध्ये महायुतीचे सर्व ७५ उमेदवार, प्रमुख नेते, पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असून, जळगाव शहरात शक्तिप्रदर्शनाचे दृश्य पाहायला मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा रोड शो म्हणजे केवळ प्रचार नव्हे, तर जळगावकरांसाठी विकासाचा विश्वास आणि भविष्यातील शहराच्या प्रगतीचा संकल्प असल्याचे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. शहरातील व्यापारी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यात या रोड शोबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, मार्गावर ठिकठिकाणी स्वागताची तयारी सुरू आहे.

महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व जळगावकर नागरिकांनी या ऐतिहासिक रोड शोला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला भक्कम पाठिंबा द्यावा, असे आवाहन मनोज भांडारकर, भाजप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख (जळगाव जिल्हा महानगर) यांनी केले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button