जळगावक्रीडामहाराष्ट्र

बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!’

‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती’ याचाच हा साक्षात्कार : अशोक जैन

लोकमाध्यम न्युज जळगाव दि : २८ जुलै २०२५

बुद्धिबळ खेळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलाही आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवता आहे याची ‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती’ याचाच हा साक्षात्कार…! अशोक जैन

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुखने भारतीय बुद्धिबळ क्रीडा जगतात स्वकर्तृत्वाची सुवर्णमुद्रा उमटवली आहे. जॉर्जिया येथे झालेल्या “FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक 2025” स्पर्धेत दिव्या व कोनेरु हम्पी एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. टायब्रेक मध्ये दिव्याने रॅपीड फॉरमेंटमध्ये कोनेरु हम्पीचा पराभव केला. विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत पोहचणाऱ्या दोन्ही महिला भारतीय होत्या हे विशेष!

चीनच्या टॅन झोंगयीला दिव्याने पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. जागतिक मानांकन असलेल्या प्रतिष्ठित कँडिडेटस स्पर्धेत दोन्ही भारतीय महिलांचे मानाचे स्थान सर्वात्कृष्ट कामगिरीमुळे निश्चित झाले आहे.

दिव्याच्या कारकिर्दीतील हे एक महत्त्वाचं पाऊल ठरले असून दिव्याचे हृदयपूर्वक अभिनंदन! सांगताना आनंद होतो की, जळगावात २०२२ ला नॅशनल टिम चेस चॅम्पीयन स्पर्धेतही दिव्याने सुवर्णपदक त्यावेळी प्राप्त केले होते. दिव्याच्या शिस्तबद्ध खेळण्याची, खेळाप्रती असलेले समर्पणाची जवळून पारख जाणकारांना झाली होती. दिव्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील घवघवीत सुयश बुद्धिबळ क्षेत्रात विशेष काही करु इच्छिणाऱ्या पुढील पिढीसाठी अतिशय प्रेरणादायी आहे.

अशोक जैन
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सल्लागार

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button