जळगावक्रीडाक्रीडांगण

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला, प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-2026, JCL T-20 क्रिकेटचा महा-थरार सहा संघांमध्ये 18 ते 26 एप्रिल दरम्यान कांताई नगर, जैन ड्रिम स्पेसेस मेहरूण तलावाजवळ येथे रंगणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सहा संघ मालक, प्रशिक्षक, खेळाडूंनी सहभाग घेतला.

काव्यवरत्नाली चौक येथून निघालेल्या रॅलीला हिरवी झेंडी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, दाल परिवारचे अतुल कोगटा, एस. के. ट्रान्सलाईनचे प्रणव कोठारी, सातपुडा आटोमोबाईलचे किरण बच्छाव, सुहांस केमिकल्सचे संदीप काबरा, एम. व्ही. जे. इंटस्ट्रीयल कन्सलन्टशी सीए महावीर जैन, विमल जैन, खलिल बनवट, सागर पार्क क्लबचे सर्व सहकारी, अनिल कांकरिया, जिल्हा क्रिकेट असोशिऐशनचे सचिव अरविंद देशपांडे, खजिनदार राजेंद्र लढ्ढा, अॅड. सुरज जहॉंगिर उपस्थित होते.

खेळाडू, प्रशिक्षक व संघ मालक यांनी मोटर सायकल रॅली सहभाग घेतला. ही रॅली काव्यरत्नावली चौक येथून निघून कलेक्टर बंगला मार्ग, मू. जे. महाविद्यालय, प्रभात चौक, स्वातंत्र चौक, पांडे डेअरी चौक, बेंडाळे चौक, चित्रा चौक मार्गे पुन्हा काव्यरत्नावली चौक येथे पोहचली.

याठिकाणी संघ मालक व मान्यवरांच्या हस्ते जर्सीचे अनावरण केले. जळगाव कोगटा किंग, पाचोरा एसकेटी योद्धाज, जामनेर सातपुडा हिरोज, चाळिसगाव एसपीसीसी चॅलेर्न्स, अमळनेर सुहांस जायंटस, रावेर रॉयल्स संघाचे टि शर्ट (जर्सी) अनावरण करण्यात आले.

आता मौका.. जळगाव क्रिकेट लीगचा..

आता मौका… जळगाव क्रिकेट लीगचा.. खेळाची ताकद दाखविण्याचा, जळगावची शान उंचाविण्याचा.. या टॅग लाईनच्या घोषणा उत्साहाने खेळाडूंनी दिल्यात. संघांचे फ्लॅग, प्रत्येक संघाचे टी शर्ट घालून सहभागी झालेले खेळाडूंनी जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले. जळगाव क्रिकेट लिग-2026 या स्पर्धेमुळे शहरात क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भव्य रॅली यशस्वीतेसाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्यांसह रविंद्र धर्माधिकारी, समिर गुळवे, हितेंद्र पटेल, प्रशांत विरकर, वरुण देशपांडे, जगदीश चावला, मोहम्मद फजल, उदय सोनवणे, युवाशक्तीचे विराज कावडिया यांच्यासह सहकारी यांनी सहकार्य केले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button