जळगावऔद्योगिकशैक्षणिक

जळगावमध्ये १३ जुलै रोजी ‘पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेळावा’; आयटीआय, डिप्लोमा व पदवीधर उमेदवारांसाठी संधी उपलब्ध

| लोकमाध्यम न्युज | जळगाव दि. 6 (जिमाका): औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ITI शिल्पकारागिर योजनेतील व्यवसायातील प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत आस्थापना मध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण घेण्याकरीता PM NATIONAL APPRENTICESHIP [ MELA] भरती मेळावा शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था (ITI) जळगांव नॅशनल हायवे नं.६ तंत्र निकेतन समोर जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. हा भरती मेळावा दि. १३ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील आयटीआय शिल्पकारागीर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तसेच दहावी, बारावी, डिप्लोमा आणि पदवी उत्तीर्ण उमेदवारांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये अप्रेंटिसशिपची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेळा (PM National Apprenticeship Mela)’ चे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान राष्ट्रीय अप्रेंटिसशिप योजनेअंतर्गत आयोजित या मेळाव्यात जळगाव जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील नामांकित कंपन्या सहभागी होणार असून, पात्र उमेदवारांना थेट अप्रेंटिसशिपसाठी निवडीची संधी मिळणार आहे.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी संबंधित उमेदवारांनी ApprenticeshipIndia.org या वेब पोर्टलवर नोंदणी (रजिस्ट्रेशन) करणे आवश्यक आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह मेळाव्याच्या दिवशी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र (BTIU), जळगाव यांनी केले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button