जळगावअध्यात्मिकधार्मिक

अधिक मासा निमित्त सुरभी व श्री सिद्धिविनायक महिला मंडळातर्फे श्री विष्णू सहस्र नाम पठण; श्री सिद्धिविनायक मंदिरात १७ जुन पर्यंत आयोजन

| लोकमाध्यम न्युज | जळगाव : अधिक मासा निमित्त जुने जळगावातील श्रीराम मंदिरात सुरभी व श्री सिद्धिविनायक महिला मंडळा तर्फे श्री विष्णूसहस्रनाम पठण करण्यात आले.

सुरवातीला ओम नमो भगवते वासुदेवाय चा जप करून पठनाला सुरवात करण्यात आली. रश्मिताई मंगेश महाराज जोशी, अध्यक्षा स्वाती कुळकर्णी व सर्व उपस्थित महिलांच्या हस्ते आरती करण्यात आली. स्वाती कुळकर्णी ह्यांनी सौ रश्मिताई जोशी ह्यांचा ओटी भरून सन्मान केला. उपस्थित महिलांनी , भगवान श्री राम, सिता व लक्ष्मणाला अधिक मासानिमित्त वाण लावण्यात आले. ह्यावेळी सुरभीच्या मानसी जोशी, ज्योती भोकरडोळे, पूनम जोशी, सुनीता सातपुते, आशा जोशी, सविता नाईक, स्मिता बंगाली व सदस्य तसेच श्री सिद्धिविनायक मंडळाच्या सदस्य व परिसरातील महिला उपस्थित होत्या.

रश्मिताई जोशी ह्यांनी स्वाती कुळकर्णी ह्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. व उपस्थित सर्व महिलांची ओटी भरली. गणपतीची , देवीची, श्री रामाची व गोपाळ कृष्णाच्या आरतीने तसेच ऋचा मोहरीर ह्यांनी दिलेल्या प्रसादाने सांगता करण्यात आली.ह्यावेळी ह भ प श्री मंगेश महाराज जोशी उपस्थित होते.

१७ जुन पर्यंत पठणाचा कार्यक्रम सकाळी 8 वा कृषी कॉलनी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात सुरु रहाणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी असून उपस्थितीचे आवाहन अध्यक्षा स्वाती कुळकर्णी ह्यांनी केले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button