जळगांव जिल्हापोलीस

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड, नागपुरातून परराज्यातील ३ आरोपी जेरबंद

१६ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी

| लोकमाध्यम न्युज | भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहरातील घरफोडीचा गंभीर गुन्हा अवघ्या १२ तासांच्या आत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी केली आहे. या प्रकरणात हरियाणा व बिहार राज्यातील तीन आरोपींना नागपूर येथून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १६ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक १ जून २०२६ रोजी फिर्यादी यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ३१ मे रोजी कामानिमित्त बाहेर गेल्याने त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(३), ३३२(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपास करून गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेची विविध पथके तयार करण्यात आली.

पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी तसेच तांत्रिक विश्लेषण केले. तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत आरोपींबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपी राजू जसपालसिंग (वय ४२, रा. हरियाणा), भोला उर्फ बिरेंद्र सुखदेव पासवान (वय ४०, रा. बिहार) आणि राजेश पारस शहा (वय ५२, rा. बिहार) हे नागपूर येथे असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर पोलिसांच्या मदतीने तात्काळ कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीदरम्यान आरोपींनी घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १६,३४,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकातील –पोलीस उपनिरीक्षक शरद बागल,पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपाळ गव्हाणे,उमाकांत पाटील,प्रशांत परदेशी,राहुल वानखेडे पोलीस नाईक विकास सातदिवे यांनी ही उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी बजावली.

या कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्यांचा वेगाने छडा लावण्यातील जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button