जळगावअध्यात्मिकधार्मिक

श्री क्षेत्र अक्कलकोट येथील स्वामी समर्थ पालखी 7 जून रोजी जळगावात

| लोकमाध्यम न्युज | जळगाव,प्रतिनिधी – श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ पालखी – पादुकांचे 7 जून रविवार रोजी जळगाव नगरीत शुभ आगमन होणार आहे.सकाळी 12 वाजेच्या सुमारास अभिषेक व महाआरती झाल्यावर महाप्रसाद कार्यक्रम होईल व त्यानंतर पालखी मार्गस्थ होईल.

श्री क्षेत्र अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या पालखी – पादुका परिक्रमेचे आयोजन करण्यात येते. परगावच्या भाविकांना श्री स्वामींच्या दर्शनाचा लाभ व्हावा आणि मंडळाच्या वतीने अक्कलकोट येथे बांधण्यात येत असलेल्या भव्य प्रसादालय आणि भक्तनिवास साठी निधी उपलब्ध व्हावा या उद्देशातून या पालखी परीक्रमेचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र,कर्नाटक गोवा असा या परिक्रमेचा सुमारे सहा महिन्यांचा प्रवास असतो.

शहरातील सुकदेव शिरसाळे यांच्याकडे गेल्या 19 वर्षांपासून हा योग येत असून यंदाचे विसावे वर्ष आहे. दि 7 जून रविवारी सकाळी 11 वाजेला गणेशवाडी परिसरातील श्री रामदेवबाबा मंदिराजवळ पालखीचे आगमन होईल तेथून सवाद्य मिरवणुकीने पालखी त्यांच्या निवासस्थानी येईल .तेथे अभिषेक महाआरती होऊन महाप्रसाद कार्यक्रम होईल. भाविक भक्तांनी पुरुषोत्तम मासाच्या पवित्र काळात दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिरसाळे परिवारातर्फे करण्यात आले आहे.

 

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button