रोहित निकम यांचा ढोल ताशांचा गजर व फटाक्यांच्या आतषबाजीत मित्र परिवारा कडून स्वागत सत्कार
राज्य मार्केटींग फेडरेशनच्या व्हा.चेअरमन पदी निवडीबद्दल करण्यात आला सत्कार
जळगाव दि.३० : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ म्हणजेच राज्य मार्केटींग फेडरेशनच्या व्हा. चेअरमनपदी जळगाव जिल्हा दुध संघाचे संचालक व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर रोहित निकम यांचे जळगाव येथे आगमन झाले असता त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांचे ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतषबाजीेत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
रोहित निकम परिवारा कडून ढोल ताशांच्या गजरात नाचत व एकमेकांना पेढे भरवत स्वागत करण्यात आले. परिवारातील महिलांनी औक्षण केल्यानंतर उपस्थितांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देत सत्कार केला. तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. रुक्मिणी फाऊंडेशन चे पंकज जैन यांनी प्रास्ताविक केले.
रोहित निकम यांनी सत्कारास बद्दल ऋण व्यक्त करीत इतर जाहीर सत्कारांपेक्षा घरचा आणि मित्र परिवाराने केलेला सत्कार हा सर्वोच्च असतो असे सांगत पणन महासंघाच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली.
या प्रसंगी जेडीसीसी बँकेच्या संचालीका शैलजाताई निकम, सौ. स्वेता निकम, स्वाफ्टएड चे संचालक,जितेद्र लाठी,रितेश निकम ,पंकज जैन, ज्योती श्रीवास्तव, विजय साखंला, राजुभाई श्रॉफ, प्रविण वाघण्णा ,अँड शैलेश नागला, अनिल चोरडीया,नरेश सोनवणे,रितेश निकम,गणेश शेटे व मित्र परिवार उपास्थित होते.