जळगाव
रामद्वारा जळगाव येथे अखंड रामजप नामस्मरण
जळगाव दि.१४ : आकाशवाणी चौक महामार्गा लगत रामद्वारा (जगतपाल) जळगाव तर्फे आयोजित आदि सतगुरू सुखरामजी महाराज यांचे प्रकट दिनानिमित्त जगतपालजी चांडक गुरुजी यांचे मार्गदर्शनाखाली हॉटेल क्रेझी होम जळगांव येथे दिनांक १३ मार्च ते १४ मार्च असे दोन दिवस अखंड रामनाम जप नामस्मरणाचे आयोजन करण्यात आले होते.
तत्पूर्वी गुरूवाणीजी ग्रंथाची शोभा यात्रा काढण्यात आली. त्यांनतर राम नामाचे अखंड जप करण्यात आला. शहरातील रामस्नेही महिला, पुरुषांचा मोठ्या प्रमाणात उस्फुर्त सहभाग होता. सत्संग घेवून राम नामाचा जप करून महाप्रसादाने सांगता करण्यात आली.
असे रामद्वारा(जगतपाल) जळगांव आयोजकातर्फे राज सुर्यवंशी यांनी कळविले.