जळगावसामाजिक

आमदार राजू मामा भोळे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांनी होणार साजरा

वृक्षारोपण, रक्तदान, अन्नदान, फळवाटप, आरोग्य शिबिरांसह विविध जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन

| लोकमाध्यम न्युज | जळगाव  : जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार तथा सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात कायम सहभागी होणारे लोकनेते आ. सुरेश (राजू मामा) भोळे यांच्या १३ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी जळगाव महानगरच्या वतीने विविध सामाजिक व लोककल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, गटनेते प्रकाश बालाणी, सभागृह नेते नितीन लड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध भागांमध्ये हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, अन्नदान, फळवाटप, शालेय साहित्य वाटप, गरजू विद्यार्थ्यांना कपडे वाटप, गाईंना चारा वाटप, वाहतूक पोलिसांना पाणी व शीतपेय वितरण तसेच महिला सफाई कर्मचाऱ्यांना साडी वाटप अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ८.३० वाजल्यापासून शहरातील विविध मंडळांच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात होणार असून, त्यानंतर आरोग्य शिबिर, अंध व अपंग शाळेत फळवाटप, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अन्नदान, संत गाडगेबाबा निराधार केंद्रात भोजन व्यवस्था, रिमांड होममधील विद्यार्थ्यांना कपडे वाटप आदी उपक्रम पार पडतील.

युवा मोर्चाच्या वतीने पांजरापोळ गोशाळेत गाईंना चारा वाटप करण्यात येणार असून, मंडळ क्रमांक ४ च्या वतीने सद्गुरूनगर येथील श्री दत्त मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पिंप्राळा हुडको परिसरात लाडू व बिस्किट वाटप तसेच महिला मोर्चाच्या वतीने सफाई महिला कर्मचाऱ्यांना साडी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.

याशिवाय राजू मामा भोळे मित्रपरिवाराच्या वतीनेही विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

सदर कार्यक्रमांना भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हा पदाधिकारी, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, नगरसेवक, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, भारती सोनवणे, नितीन इंगळे, जयेश भावसार तसेच जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर यांनी केले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button