जळगावधार्मिकसामाजिकसांस्कृतिक

जळगावकरांनो, पाणी जपून वापरा; मुलांच्या हातातही गरजेपुरताच मोबाईल द्या!

नगरसेवक विशाल भोळे यांचे आवाहन; दुर्गामाता महिला मंडळाच्या आरतीप्रसंगी नागरिकांना दिला महत्त्वाचा संदेश

| लोकमाध्यम News| ( पांडुरंग महाले ) जळगाव : जिल्ह्यासह राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, जळगाव शहराला धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला, तरी नागरिकांनी भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करून उन्हाळ्यापर्यंत पाण्याचा काटकसरीने वापर करावा. तसेच लहान मुलांच्या हातात मोबाईल देताना पालकांनी काळजी घ्यावी आणि त्यांना केवळ गरजेपुरताच मोबाईल वापरू द्यावा, असे आवाहन नगरसेवक विशाल सुरेश भोळे यांनी केले.

देविदास कॉलनी महिला मंडळ येथे अंबा मातेची आरती केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी पाणी बचतीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, उपलब्ध पाणी हा अमूल्य नैसर्गिक ठेवा आहे. प्रत्येकाने आपल्या गरजेपुरतेच पाणी वापरून त्याची नासाडी टाळली पाहिजे. आजपासूनच पाणी बचतीची सवय लावल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईचा सामना करणे सोपे होईल. यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच विविध उपाययोजना आणि पाणी बचतीचे संदेश सर्वांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुलांच्या मोबाईल वापरावर पालकांनी लक्ष द्यावे

आजच्या डिजिटल युगात लहान मुलांच्या हातात सहजपणे मोबाईल दिला जातो. मात्र, मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांचे खाण्यापिण्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येते. अनेक मुले नाश्ता, जेवण किंवा दूध घेतानाही मोबाईलमध्ये गुंतलेली असतात. ही बाब लक्षात घेऊन पालकांनी मुलांना मोबाईल वापरण्याची सवय लावताना योग्य मर्यादा घालणे आवश्यक आहे. मुलांच्या हातात केवळ गरजेपुरताच मोबाईल द्यावा आणि त्यांच्या आरोग्याबरोबरच दैनंदिन सवयींकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन नगरसेवक विशाल भोळे यांनी केले.

प्रारंभी महिला मंडळाच्या वतीने विशाल भोळे यांचा माधुरी बोरोले, नंदा चौधरी,शुभांगी वाघळे,पल्लवी चौधरी, शारदा झाल्टे,लीना चौधरी, शारदा शिंपी यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी अपर्णा मैती, भारती वाणी, अनिता चौधरी, रत्ना जगताप, मंगला वाघ,पूनम जगताप,चेतन चौधरी,राहुल झाल्टे,ऋषिकेश शिंपी,हर्षद झाल्टे,आदींसह मोठ्या संख्येने महिला भाविक पुरुष मंडळी उपस्थित होती.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button