जळगाव

जागतिक महिला दिनानिमित्त अनिताज् फॅशन डिझाईनिंग इस्न्टिट्युट तर्फे महिलांचा सत्कार

स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अनिताज् फॕशन हक्काचे व्यासपिठ - माजी महापौर जयश्री महाजन

जळगाव दि. ९ – अनिताज् फॕशेन डिझाईन इस्न्टिट्युट ला गेल्या २० ते २५ वर्षांपासून जुळलेल्या दहा महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. विविध कोर्स मध्ये सहभागी विद्यार्थ्यांनीना सुध्दा यावेळी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.तसेच कौशल्य विकास शिक्षण मंडळाअंतर्गत मोफत कोर्सचा देखील शुभारंभ करण्यात आला. फॕशन, ब्युटी,मेहेंदी, ज्वेलरी मेकिंग असे विविध सात प्रकारचे हे कोर्स आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर जयश्री महाजन, गांधी रिसर्च फाऊंडेशन च्या विश्वस्त ज्योती जैन, इंटरनॅशनल ब्युटीशियन डॉ. ज्योती महाजन, फॕशन डिझाईनर आणि फॕशन एज्युकेटर अनिता नांदेडकर, करिश्मा पाटील, गायत्री ठाकूर व्यासपिठावर उपस्थित होते.

अनिताज् डिजाईनिंग इन्स्टीट्युटमध्ये विविध कोर्स

अनिताज् डिजाईनिंग इन्स्टीट्युटमध्ये विविध कोर्स आहेत त्यात फॕशन डिझाईनिंग कोर्समध्ये ब्लाउज व ड्रेस डिझाईन्स, आरी वर्क, वेस्टर्न आऊट फिट ड्रेस, डिप्लोमा व प्रोफेशनल डिप्लोमा इन फॕशन डिझाईन्स, फॕशन सर्व्हिसेस, ब्युटी कोर्समध्ये डिप्लोमा व प्रोफेशनल कोर्स इन ब्युटी पार्लर, हाॕबी कोर्स मध्ये मेहंदी, रांगोळी, पुजाथाली डेकोरेशन, ब्युटी पार्लर सर्व्हिसेस येथे उपलब्ध आहेत असे प्रास्तविक करताना अनिता नांदेडकर यांनी माहिती दिली. सूत्रसंचालन विद्यार्थीनी पुजा अग्रवाल यांनी केले. खुशी निषांद यांनी आभार मानले.

स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अनिताज् फॕशन हक्काचे व्यासपिठ – माजी महापौर जयश्री महाजन

जागतिक महिलादिनानिमित्त अनिताज् फॕशन तर्फ आयोजित कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांनी व महिलांना माजी महापौर जयश्री महाजन  यांनी मार्गदर्शन केले. फॕशन क्षेत्रात करिअरच्या विविध संधी उपलब्ध असून आपल्याला मिळालेले शिक्षण हे रोजगार देणारे आहे. आपल्यातील कौशल्य हे एखाद्या मोठ्या प्रदर्शनांमध्ये सादर केले तर आणखी संधी मिळतील यातून महिला आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहून सामाजिक स्थैर्य राखता येते यासाठी अनिताज् फॕशनचे मोलाचे कार्य असल्याचे जयश्री महाजन म्हणाल्या.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button