जळगावजिल्हा बँक निवडणूक

जिल्हा बँकेत महायुतीच्या 21 पैकी 12 जागा बिनविरोध; नऊ जागांसाठी होणार मतदान!

बिनविरोध झालेल्या १२ जागा; भाजपा 4, शिवसेना 6, राष्ट्रवादी 2

| लोकमाध्यम NEWS | जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 21 पैकी 12 जागा महायुतीच्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. यात भाजपा 4, शिवसेना 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अप) 2 असे चित्र आहे. दरम्यान आता केवळ 9 जागांसाठी 29 रोजी मतदान होणार आहे. माघारीच्या अंतीम दिवशी 9 जागांसाठी 29 उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी दिली. 

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी माघारीची प्रक्रिया मंगळवारी पार पडली. माघारीच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या.

अजिंठा विश्रामगृहावरून हलली सुत्रे 

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सुमारे 241 उमेदवारांचे अर्ज रिंगणात होते. त्यामुळे अर्ज माघारीसाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण हे अजिंठा विश्रामगृह येथे उपस्थित होते. याठिकाणाहूनच माघारीची सूत्रे हलविण्यात आली. प्रमुख माघारीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, पाचोरा विका मधून बिनविरोध निश्चीत मानले गेलेले सतीश शिंदे, माजी महापौर जयश्री महाजन, विद्यमान संचालिका जनाबाई महाजन, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रभाकर सोनवणे, शामकांत सोनवणे, विद्यमान संचालक घनशाम अग्रवाल, प्रदीपदादा देशमुख, पद्मजा देशमुख यांच्यासह उमेदवारांनी माघार घेतली.

एमडींच्या अँटी चेंबरला देवकर तळ ठोकून 

अजिंठा विश्रामगृह येथे दोन्ही मंत्री घडामोडींवर लक्ष ठेऊन होते. तर दुसरीकडे जिल्हा बँकेत कार्यकारी संचालकांच्या अँटी चेंबरला माजी मंत्री गुलाबराव देवकर यादी हातात ठेऊन माघारीसाठी सूचना करीत होते.

शिंदे गटाचे सहा उमेदवार बिनविरोध   

महायुतीच्या बिनविरोध निवडीत शिवसेना शिंदे गटाने सर्वाधिक सहा जागा मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जळगाव विका मतदारसंघातून पालकमंत्री गुलाबराव पाटील, अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघातून आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, पाचोरा विका – सुमीत पाटील, भडगाव विका – सोमसिंग खुमानसिंग पाटील, एरंडोल- मृणाल पाटील, पारोळा- नलिनी पाटील अशा सहा उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

मंत्री महाजनांसह भाजपच्या चार उमेदवारांची बँकेत एंट्री

महायुतीतील दुसरा प्रमुख घटक असलेल्या भाजपनेही चार जागांवर बिनविरोध विजय मिळविला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासह रोहित निकम, मधुकर राणे आणि रजनी सावकारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जिल्हा बँकेत दुसऱ्यांदा निवडून आले आहे.

अजित पवार गटाच्या दोघांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटालाही या निवडणुकीत दोन जागांवर यश मिळाले आहे. धरणगा विका मतदार संघातून सोनल संजय पवार आणि अमळनेर विका मतदारसंघातून जयश्री अनिल पाटील या दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. महायुतीतील जागावाटपाच्या समीकरणात राष्ट्रवादीला चार ऐवजी केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button