लोकमाध्यम न्युज | जळगांव दि.३० जुलै २०२४ |
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) जळगांव महानगर (जिल्हा) तर्फे देण्यात मनपा आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगांव शहरात केंद्र शासन, राज्य शासन व म.न.पा. निधीतून काही ठिकाणी अल्प प्रमाणात सिमेंट व डांबरी रस्ते हे सार्वजनिक बांधकाम व म.न.पा. तर्फे टेंडर (निवीदा) मॅनेज करुन मर्जीतील मक्तेदारांना (लोकप्रतिनिधीचे नातेवाईक, सत्ताधारी पार्टीचे पदाधिकारी इ.) देण्यात आलले असून.
सदरील तयार केलेले सिमेंट रस्ते हे काही ठिकाणी पावसाळ्यात व डांबरी रस्ते हे हिवाळ्यामध्ये रात्री-बेरात्री उरकविण्यात आले व इतर मोसमात बनविण्यात आले. सिमेंट रस्ते व डांबरी रस्ते एक ते दिड वर्षात तर काही रस्ते हे फक्त सहा महिने व तीन महिन्यातच उखडले गेले. तसेच काही रस्त्यांना खड्डे, काही रस्त्यांना मोठ मोठे तडे गेलेले आहेत. त्यातील काही सिमेंट रस्ते हे डांबर टाकून दुरुस्त करण्यात आलेत, तर काही डांबरी रस्ते सिमेंट टाकून, काही ठिकाणी जाड रेती व जाड वेस्ट मटेरीयल टाकून करण्यात आले आहे.
शहरातील अशा रस्त्यांच्या बाबतीत आम्ही वेगवेगळ्या पक्षांनी व शहरातील नागरिकांनी रस्त्यांची निकृष्ट कामे झाल्याच्या तक्रारी या जळगांव शहर महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा कडे केलेल्या आहेत.
जळगाव शहरातील काही दिवसांपूर्वी तयार करण्यात आलेले रस्ते बुजविण्यासाठी म.न.पा.निधी तून टेंडर र काढून दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्या खड्ड्यात सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते स्वीय सहाय्यक फक्त मुरुम किंवा बांधकाम वेस्ट मटेरीयल टाकून गेल्या ५ ते ६ वर्षापासून करीत असून शहरातील (आयुक्त) म.न.पा. जळमागिरिकांनी भरलेल्या कराचा दुरुपयोग व मर्जीतील ठेकेदार व कार्यकर्त्यांचे पोट भरण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेले रस्ते, पुल, गटारी व तत्सम कामाच्या दुरुस्तीची जबाबदारी हे ५ ते १० वर्षापर्यंत त्या मक्तेदाराची असते अशी निवीदेतच प्रमुख अट असतांना जळगांव शहरात करण्यात आलेल्या कामाच्या दुरुस्तीची जबाबदारी ही मक्तेदाराची असतांना त्यावर वेगळा निधी खर्च करण्याचे प्रयोजन काय ? असा प्रश्न जळगांव शहर वासियांना पडलेला आहे.याकरिता शहरातील रस्ते दुरुस्ती नावाखाली उधळपट्टी करण्यात येणाऱ्या म.न.पा. निधीचा दुरुपयोग थांबवावा अशी मागणी या निवेदनामार्फत आयुक्तांना करण्यात आली आहे. निवेदन देते वेळी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी,सुनील माळी,किरण राजपुत, रिकु चौधरी,संग्राम सिंह सुर्यवंशी, सुहास चौधरी,रहिम तडवी,नामदेव वाघ,मतीन सय्यद उपस्थित होते.