जळगांव जिल्हाताज्या बातम्याधार्मिक
चला रे वैष्णव हो जाऊ, पंढरीसी ;श्री संत मुक्ताबाई राम पालखी उद्या श्रीक्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान

लोकमाध्यम न्युज जळगाव दि : ९ जून २०२५
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आषाढी यात्रेकरिता श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्रीराम मंदिर संस्थान ( जुने जळगाव ) संचलित श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळा दि. ९ जुन सोमवारी श्रीराम मंदिरात हरिपाठ, परंपरेचे भजन आरती होइल. कुमारिका मुलींच्या व समस्त वारकरी मंडळीच्या शुभहस्ते पालखीचे पूजन होऊन सायंकाळी ५ वा. निघेल. रात्री श्री. संत अप्पा महाराज समाधी मंदिर येथे मुक्काम करून दि. १० जून वटपौर्णिमा मंगळवार सकाळी ६.३० ते ७.३० परंपरेचे भजन पूजन आरती होऊन सकाळी ८ वा. श्री. क्षेत्र पंढरपूर कडे पालखीचे असंख्य वारकरी मंडळी सह प्रस्थान होइल. या वेळी जळगावातील भाविक श्री मुक्ताई पालखीला निरोप देण्यासाठी उपस्थित राहतील





