छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयाची भव्य मिरवणूक
महाराजांची विचारसरणी जनतेपर्यंत पोहचविणार : प्रशांत नाईक
जळगांव दि.२० : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तसेच महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी या सोहळ्याची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सपत्नीक अश्वावर विराजमान असलेल्या शिवाजी महाराजांचे पूजन केल्या नंतर राज्यगीताने शिवजयंती सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवजन्म पाळणा, अफजलखानाचा वध तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवरील गाण्यांवर नृत्य केले .सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आम्ही महाराजांची विचार स्मारके जनतेपर्यंत पोहोचवण्याच काम करत आहोत असे संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाला आमदार राजू मामा भोळे , आशुतोष पाटील, सदा बापू सोनवणे ,शामकांत सोनवणे, प्रकाश घुगे ,सुनील वंजारी, शेखर सोनवणे ,हर्षल ढाकणे , व सर्व शिक्षकवृंद पालक गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.