जळगांव जिल्हा

पाचोऱ्यात स्मिता वाघ यांच्या विजयासाठी शिवसेना-युवासेना यांच्यातर्फे हनुमान चालीसा पठण

जळगाव दि.२३ : नरेंद्र मोदी हे पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावे आणि महायुतीच्या जळगावमधील लोकसभा उमेदवार स्मिता वाघ ह्या प्रचंड मताधिक्याने निवडून याव्यात, यासाठी हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम शिवसेना व युवासेना यांच्यातर्फे मंगळवारी पाचोरा शहरात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान, शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी घटक पक्ष महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांना पाचोरा-भडगावमधून सर्वाधिक मताधिक्य देऊन महाराष्ट्रात नव्हे तर देशात पहिल्या पाचमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघाचा क्रमांक यायला पाहिजे यासाठी सर्वांनी जोराने कामाला लागावे, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गोहील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा शिवसेना तालुकाप्रमुख सुनील पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर, युवासेना जिल्हा प्रमुख जितू जैन, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, शिवसेना शहर प्रमुख बंडू चौधरी, युवासेना तालुका प्रमुख अनिल पाटील, युवासेना शहर प्रमुख सुमित सावंत ,युवासेना शहर प्रमुख भोला पाटील तसेच मोठ्या प्रमाणात शेकडो शिवसेना-युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button