जिजाऊच्या लेकिंचे फातिमाबी च्या लेकिंनी केले स्वागत
सै.नियाज अली भैय्या फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

जळगांव दि.१८ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, बहुजन प्रतिपालक ,श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तर्फे आयोजित महिलांच्या मोटासायकल रलीचे भीलपुरा चौक येथे आगमन झाल्यावर सै. नियाज अली भैय्या फाऊंडेशन तर्फे मुस्लिम महिलांच्या हस्ते पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत करण्यात आले.
भिलपुरा चौकात रॅलीचे आगमन होताच फातिमा बी च्या लेकींनी म्हणजेच मुस्लिम महिलांनी आई जिजाऊ च्या लेकींचे म्हणजेच रॅलीत सहभागी हिंदू महिलांवर जोरदार पुष्प वृष्टी तसेच गुलाबाचे फुल देऊन जोरदार स्वागत करण्यात आले. सै. नियाज अली भैय्या फाऊंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्तुत्य उपक्रम प्रसंगी सै. सिनिम बेगम अयाज अली, सै . सरवत इस्लाम रियाज अली, हुसना बी शेख, शगुप्ता नियाज अली ,नूर जहा बी कुरेशी, सईदा बी जावेद, अफरोज बी रऊफ, आबेदाबी वली मोहम्मद, नसरीन बी शेख सांडू, निकहत बी नासिर, समीना बी अजगर अली, गजाला बी बशीर, फरजाना बी, नसरीन बी, नाझियाबी , झीनत बी रंगरेज यांच्या अनेक महिला उपस्थित होत्या.